Farmers in Bihar: नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! शेत एक एकर आणि पिकं 36, उत्पन्न किती ?? तुम्हीच बघा...

बिहारच्या पूर्णिया येथे राहणारा शेतकरी अंकित सिंह सध्या चर्चेत आहे.
Ankit Singh Bihar
Ankit Singh BiharDainik Gomantak

Farmers in Bihar: शेतकऱ्याला सर्व जगाचा पोशिंदा म्हटले जाते. पण सरकार दरबारी शेतकरी नेहमीच उपेक्षित राहिला आहे. ओसाड रानावर बाग फुलविण्याचे कसब फक्त शेतकऱ्यालाच अवगत असते. आणि शेतकरी ईर्ष्येला पेटल्यास तो शेतात मोठा चमत्कर घडवून आणू शकतो.

असाच चमत्कार बिहारच्या पूर्णिया (Purnia Bihar) येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने केला आहे.

बिहारच्या पूर्णिया येथे राहणारा शेतकरी अंकित सिंह (Ankit Singh) सध्या चर्चेत आहे. पूर्णियाच्या या तरुणाने आपल्या एक एकर शेतात 36 प्रकारची पिके घेऊन तब्बल 12 लाख रुपयांचे उत्पन्न कमवले आहे.

लहानपणापासूनच अंकितला शेतीची आवड आहे, कारण त्याचे वडील शेतकरी आहेत आणि त्यामुळेच वडिलांसोबत शेती करण्याची सवय आहे. असे त्याने सांगितले.

गेल्या 15 वर्षांपासून वडिलांना शेतात मदत केल्यामुळे त्यांची शेतीची ओढ कायम होती. पूर्णिया येथून शेतीचे शिक्षण घेण्यासाठी अंकित बिहारच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये गेला. शेतीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तो घरी परतल्यावर वडिलांना शेतीत मदत करतो.

Ankit Singh Bihar
USA: अभिमानास्पद! अमेरिकेच्या हवाई दलाच्या सहाय्यक संरक्षण सचिवपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी

अंकितने आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. अंकितने एक एकर क्षेत्रात 36 प्रकारची पिके घेत विक्रम केला आहे. अंकितने हंगामी भाज्या, कांदा, लसूण, बटाटे, सिमला मिरची, गाजर, ब्रोकोली आणि ऑलिव्हसह अनेक पिकांची लागवड करून नवीन विक्रम केला आहे.

अंकितच्या शेतीची खास गोष्ट म्हणजे खरेदीदार स्वतः त्याच्याकडे येतात आणि भाजीपाला आणि फळे खरेदी करतात. अंकितने आपल्या शेतात घेतलेली पिकेही कृषी जत्रेत दाखवली असून कृषी विभागाने अंकितला ऑलिव्ह, कांदे, ब्रोकोली या पिकांचे चिन्ह देऊन त्याचा गौरवही केला आहे.

अंकितचे वडील आता परबलची रोपे लागवडीसोबतच तयार करून विकतात, तर त्याची आई मशरूमच्या लागवडीतून चांगले उत्पन्न घेत आहे.

अंकितने 1 एकरमध्ये घेतलेल्या 36 प्रकारच्या पिकांपैकी त्याला तीन पिकांचे बंपर उत्पादन मिळाले. कृषी मेळ्यात आपले उत्पादन दाखवून अंकितला एकाच वेळी तीन पुरस्कार मिळाले. अंकितला ऑलिव्ह आणि कांद्याच्या उत्पादनासाठी प्रथम, अंकितला ब्रोकोली उत्पादनासाठी तृतीय पारितोषिक मिळाले.

तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केली तर त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असे अंकितने म्हटले आहे. अंकितने सांगितले की, शेतीचा अभ्यास केल्याने त्याला शेतीच्या नवीन पद्धतींचा अवलंब करून उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com