Adhar Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

UIDAI ने केली मोठी घोषणा, आधार कार्ड असलेल्या करोडो लोकांना जोर का झटका!

Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना अनेक वेळा आपण चुकीची माहिती भरतो किंवा काही इतर गोष्टी भरायला विसरतो, ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Manish Jadhav

Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना अनेक वेळा आपण चुकीची माहिती भरतो किंवा काही इतर गोष्टी भरायला विसरतो, ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आधार कार्ड बनवताना योग्य माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे.

UIDAI ने आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, जेंडर अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, तुम्ही कितीही वेळा माहिती अपडेट करु शकत नाहीत.

आधार कार्ड इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे का आहे?

आधार कार्ड (Aadhar Card) इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे असते कारण त्यात बायोमेट्रिक असते. त्यामुळे ती योग्य माहितीसह अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हालाही समस्या येऊ शकतात.

आधार कार्डमध्ये किती वेळा नाव बदलता येईल

तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव फक्त 2 वेळा बदलू शकता. तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असल्यास किंवा तुम्हाला लग्नानंतर तुमचे आडनाव बदलायचे असेल तर तुम्ही ते बदलू शकता. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्हीही करु शकता.

आधार कार्डमध्ये जेंडर किती वेळा बदलता येईल

अनेक वेळा असे घडते की, आधार कार्ड बनवताना चुकीच्या पद्धतीने जेंडरविषयी माहिती भरली जाते. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही फक्त 1 वेळा बदलू शकता.

आधार कार्डमध्ये जन्मतारीख किती वेळा बदलता येईल

जर जन्मतारीख चुकीची टाकली असेल, तर तुम्ही ती फक्त 1 वेळा बदलू शकता.

आपण कोणती माहिती कधीही बदलू शकतो

घराचा पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो, फिंगर प्रिंट आणि रेटिना स्कॅन यासारखी काही माहिती आधार कार्डवर वारंवार बदलली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: क्राईम ब्रँचमध्ये 'सरकारी जावई'

Goa Water Crisis: साळावली धरणाशेजारीच पाण्यासाठी वणवण! ग्रामस्थांची व्यथा समोर येताच मानवाधिकार आयोगाची अधिकाऱ्यांना नोटीस

India vs New Zealand ODI: न्यूझीलंडला मोठा धक्का! स्टार सलामीवीर दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर; 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

Kadamba Bus Strike: 12 नोव्हेंबरला कदंब बससेवा ठप्प होणार? 22 मागण्यांसाठी चालक-कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत!

Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! बस-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; 11 जणांचा मृत्यू, 33 प्रवासी गंभीर जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT