Aadhaar Card Update: आधार कार्डबाबत मोदी सरकारने दिली मोठी अपडेट, लगेच पाहा

Aadhaar Card Latest News: देशभरातील करोडो आधार कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे.
Aadhaar Card
Aadhaar Card Dainik Gomantak

Aadhaar Card Update: देशभरातील करोडो आधार कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुमच्याकडेही आधार कार्ड असल्यास, तुम्हालाही सरकारकडून 4,78,000 रुपयांचे कर्ज दिले जात आहे का? आजच्या काळात आधार कार्डचा वापर कोणतेही काम करण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत केंद्र सरकार तुम्हाला आधार कार्डवर कर्जाची सुविधा देत आहे का? जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण-

सरकार कर्ज देते का?

अलीकडे, सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सरकार आधार धारकांना 4,78,000 रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे. पीआयबीला या मेसेजची सत्यता तपासली आहे.

Aadhaar Card
Aadhaar Card मध्ये या गोष्टी लगेच अपडेट करा, नाहीतर होईल अडचण!

पीआयबीने ट्विट करुन माहिती दिली

पीआयबीने तथ्य तपासणी करुन सत्यता शोधून काढली आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता तपासल्यानंतर पीआयबीने ही पोस्ट पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे.

ही बातमी खोटी आहे

केंद्र सरकारकडून (Central Government) अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या तपासणीत ही बातमी खोटी आढळली आहे. यासोबतच अशा व्हायरल पोस्ट कोणासोबतही शेअर करु नयेत यासाठी सर्वांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

Aadhaar Card
Aadhaar Card: मोफत राशन घेणार्‍यांसाठी मोठी अपडेट, तुम्हीही म्हणाल...

अशा प्रकारे तथ्य तपासा

सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकदा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या बातम्यांबाबत तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही पीआयबीद्वारे तथ्य तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक 8799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर माहिती पाठवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com