Money Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय!

8th Pay Commission Update: तुम्हीही नोकरी करत असाल तर सरकारकडून (मोदी सरकार) 8 व्या वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Manish Jadhav

8th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही नोकरी करत असाल तर सरकारकडून (मोदी सरकार) 8 व्या वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

अलीकडेच, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने वाढ केली असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे.

आता जुलै महिन्यात सरकार पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच नवीन वेतन आयोग स्थापन करु शकते आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात 44 टक्क्यांहून अधिक वाढ होणार आहे.

पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल

देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी (Employees) 8 वा वेतन आयोग आणण्याची मागणी करत आहेत. यावेळी पुन्हा एकदा देशभरात 8 व्या वेतन आयोगाबाबत चर्चा चांगलीच रंगली आहे. याचा फायदा देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

भागवत कराड यांनी संसदेत नमूद केले

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आठव्या वेतन आयोगाबाबत संसदेत (Parliament) चर्चा केली. लोकसभा निवडणुकीनंतर 8 व्या वेतन आयोगावर चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी, मागील वेतन आयोगाच्या आधारे गणना केली जाईल.

2024 मध्ये नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो

असे मानले जाते की, सरकार 2024 च्या अखेरीस नवीन वेतन आयोग स्थापन करु शकते आणि 2026 मध्ये त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वात मोठी वाढ होणार आहे.

7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत यामध्ये मोठे बदल होऊ शकतात. सुमारे 10 वर्षांनी वेतन आयोगात बदल करण्यात आला आहे.

पगारात किती वाढ होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे की, सध्या किमान वेतन मर्यादा 18,000 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये वाढीमध्ये फिटमेंट फॅक्टरला खूप महत्त्व देण्यात आले आहे.

हा घटक 2.57 पट आहे, जरी 7 व्या वेतन आयोगात तो 3.68 पट ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. यावर सरकारने सहमती दर्शवल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

SCROLL FOR NEXT