8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, मोदी सरकार लककरच घेणार 'हा' निर्णय

8th Pay Commission: सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पुढील महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

8th Pay Commission: सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पुढील महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे.

मात्र याआधी लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

वास्तविक, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Election) ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी केली जात आहे. 8 वा वेतन आयोग लागू होणार नसल्याचीही चर्चा आहे.

शेवटच्या वेतन आयोगाच्या आधारे गणना केली जाईल

8 व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

याबाबत चर्चा सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता.

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. मागील वेतन आयोगाच्या तुलनेत त्याची गणना केली जाईल.

Prime Minister Narendra Modi
8th Pay Commission बाबत मोठी अपडेट, या दिवशी होणार लागू! कर्मचाऱ्यांचा पगार...

नवीन वेतन आयोग कधी लागू होणार?

8 वा वेतन आयोग 2024 च्या अखेरीस स्थापन होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर एक ते दोन वर्षांत त्याची अंमलबजावणी होऊ शकते. म्हणजेच 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीस ते लागू होऊ शकते.

7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात काही बदल आहेत. फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पगारात कोणतीही वाढ होणार नाही. त्यापेक्षा अन्य कोणत्यातरी सूत्राद्वारे पगार वाढवला जाईल.

पगार कधी किती वाढला?

- चौथ्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 27.6% वाढ झाली होती. यामध्ये किमान वेतन 750 रुपये निश्चित करण्यात आले.

- पाचव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात 31 टक्क्यांची मोठी वाढ झाली होती. त्यामुळे त्यांचे किमान वेतन दरमहा 2550 रुपये झाले.

Prime Minister Narendra Modi
8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी!

-सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 पट ठेवण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 54 टक्के वाढ झाली. तर बेसिक सॅलरी 7 हजार रुपये झाली.

-सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरला आधार मानून 2.57 पट वाढ झाली. किमान मूळ वेतन 18,000 रुपये झाले आहे. कर्मचारी आता फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. परंतु ते 2.57 पटीने कायम आहे.

किमान पगार किती वाढणार?

8 व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर आधार म्हणून ठेवला जाऊ शकतो. या आधारावर कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढवले ​​जाऊ शकते. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात 44.44 टक्के वाढ होऊ शकते. कर्मचार्‍यांचे किमान वेतन 26,000 रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com