8th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या अनेक दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाच्या नव्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Manish Jadhav

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या अनेक दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाच्या नव्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान, नॅशनल काउन्सिल-जॉइंट कंसल्टेटिव्ह मशिनरीच्या 49व्या बैठकीतून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली. कॅबिनेट सचिवांनी कर्मचाऱ्यांशी संबंधित 5 प्रमुख मुद्दे आणि मागण्या पुढील विचारार्थ 8व्या वेतन आयोगाकडे पाठवण्याची शिफारस केली. या मागण्यांमध्ये पेन्शन सुधारणा, वेतन समानता आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्व लाभ यांसारख्या गंभीर विषयांचा समावेश आहे.

8वा वेतन आयोग जुलै महिन्यात कर्मचारी संघटना आणि युनियन्ससोबत सविस्तर चर्चा आणि वाटाघाटींची पुढील फेरी सुरु करणार आहे, म्हणूनच या शिफारसींना आता विशेष महत्त्व प्राप्त झाले. 'NC-JCM'च्या कर्मचारी वर्गाने बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या समस्या या बैठकीत लावून धरल्या. त्यांच्या प्रमुख मागण्यांनुसार, दर पाच वर्षांनी पेन्शनमध्ये सुधारणा करुन ती वाढवण्यात यावी आणि निश्चित वैद्यकीय भत्ता वाढवून तो प्रतिमहिना 3000 रुपये करण्यात यावा.

दुसरी मागणी म्हणजे, मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मिळणारी फॅमिली पेन्शन ही वेतनाच्या 30 टक्क्यांपेक्षा कमी असू नये. याशिवाय केंद्र सरकारच्या अग्निशमन दलातील (Firefighters) कर्मचाऱ्यांचे वेतन दिल्ली फायर सर्व्हिसच्या समकक्ष आणून वेतन समानता द्यावी. 'MACP' चा लाभ घेतल्यानंतर पदोन्नती मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती सुलभ व्हावी आणि महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व लाभ कायदा 1961 मधील तरतुदी लागू केल्या जाव्यात, या मागण्यांचा यात समावेश आहे.

कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करण्याबाबत सरकारला पुन्हा विचार करण्याची विनंती केली. आयोगाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार, 6-7 जुलै रोजी भुवनेश्वर येथे आणि 9-10 जुलै रोजी कोलकाता येथे कर्मचारी संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठका पार पडणार आहेत. या बैठकांमध्ये इतर संघटनांनीही या मागण्यांना पाठिंबा दिल्यास कर्मचाऱ्यांची बाजू अधिक मजबूत होईल.

नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेल्या 8व्या वेतन आयोगाला आता 8 महिने पूर्ण होत असून, सरकारला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी अजून 10 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अद्याप वेतनवाढ किंवा फिटमेंट फॅक्टरवर कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला, तरी जुलै महिन्यातील या बैठका केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Employees) भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

Europe Heatwave: युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर! फ्रान्समध्ये 1000 हून अधिक मृत्यू; 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे परिस्थिती गंभीर

Mann Ki Baat: 'मन की बात' की 'मनातील गुपित'? ज्वलंत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून 'मोदी सरकार'ला काय साध्य करायचंय?

Paper Leak: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ! पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याचं सत्र थांबणार कधी?

SCROLL FOR NEXT