8th Pay Commission Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

8th Pay Commission 1 year Completion Updates: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Manish Jadhav

8th Pay Commission 1 year Completion Updates: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 3 नोव्हेंबर 2025 रोजी या आयोगाची स्थापना झाली असून, 3 नोव्हेंबर 2026 रोजी या आयोगाला एक वर्ष पूर्ण होत आहे. अद्याप वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये होणाऱ्या बदलांबाबत कोणतीही अंतिम शिफारस आली नसली, तरी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे अपडेट्स दिले जात आहेत.

आतापर्यंतच्या अपडेट्समध्ये मुंबई दौऱ्याची तयारी, सल्लागार (कंसल्टेंट) नियुक्तीची प्रक्रिया, विविध भागधारकांकडून (स्टेक होल्डर्स) मागवण्यात येत असलेले सूचनांचे प्रस्ताव, देशभरातील शहर दौऱ्यांचे वेळापत्रक आणि इतर प्रशासनिक व्यवस्थांची माहिती देण्यात आली.

आठव्या वेतन आयोगाची अंतिम अहवाल कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या आयोगामध्ये पंकज जैन (सदस्य-सचिव) आणि प्राध्यापक पुलक घोष यांचा समावेश आहे. आयोगाच्या अटींनुसार (ToR), स्थापनेपासून 18 महिन्यांच्या आत शिफारसी देण्याची मुदत आहे. यानुसार मे 2027 पर्यंत अहवाल सोपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

त्यानंतर केंद्र सरकार या शिफारसींची सखोल समीक्षा करुन त्या मंजूर करणे, त्यात संशोधन करणे किंवा लागू करण्याबाबत अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे अहवाल सादर झाल्यानंतर प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या (Employees) हातात संशोधित वेतन पडण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा 'फिटमेंट फॅक्टर' हा असणार आहे. जुन्या मूळ वेतनाचे नवीन वेतन रचनेत रुपांतर करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर एक महत्त्वाचा गुणक म्हणून काम करतो. सध्या कोणत्याही एका आकड्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले नसले, तरी कर्मचाऱ्यांनी 1.83, 2.57 आणि 3.83 यांसारख्या आकड्यांना संभाव्य गणना आणि मागण्यांच्या स्वरुपात पाहावे. प्रत्यक्ष वेतन वाढ किती होईल, हे आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल. सध्या देशभरातील कर्मचारी, पेन्शनधारक आणि युनियन्स अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

Shocking Video: नशेविरोधात लढणाऱ्या माजी कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल; मेडिकल स्टोरमध्ये घडला रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT