Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: DA आधी प्रमोशनसंबंधी खूशखबर, केंद्र सरकारने बदलले नियम; नोटिफिकेशन जारी

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA (DA Hike) मध्ये वाढ होणार आहे, मात्र त्याआधी सरकारने कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीसंदर्भात मोठी बातमी दिली आहे

Manish Jadhav

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA (DA Hike) मध्ये वाढ होणार आहे, मात्र त्याआधीच सरकारने कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीसंदर्भात मोठी बातमी दिली आहे.

याचा फायदा त्या कर्मचाऱ्यांना होईल, जे सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेत आहेत आणि संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत.

सरकारने पदोन्नतीच्या नियमांमध्ये बदल केले असून, त्याबाबतची माहिती अधिसूचना जारी करुन देण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली

संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी (Employees) पदोन्नती यादी जाहीर करण्यात आली आहे. किमान सेवेच्या नियमात सुधारणा करण्यात आली आहे.

अधिसूचना जारी केली

मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे. पदोन्नतीसाठी पात्रतेची माहिती या अधिसूचनेत देण्यात आली आहे.

श्रेणीनुसार शेअर यादी

प्रत्येक स्तरानुसार पदोन्नतीचे निकष ठरवण्यात आले आहेत. यासोबतच निवेदनही देण्यात आले आहे. याशिवाय श्रेणीनिहाय यादीही शेअर करण्यात आली आहे.

किती अनुभव असावा

पदोन्नतीसाठीच्या सेवेच्या यादीनुसार लेव्हल 1 ते 2 आणि 2 ते 3 मधील कर्मचाऱ्यांना 3 वर्षांचा अनुभव असावा. लेव्हल 2 ते 4 साठी 8 वर्षांचा अनुभव असावा. तर लेव्हल 3 ते 4 साठी 5 वर्षांचा अनुभव असावा.

लेव्हल 17 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि लेव्हल 6 ते 11 साठी 12 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्या आधारे कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे.

महागाई भत्ता लवकरच वाढेल

केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट देऊ शकते. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत डीएची घोषणा केली जाऊ शकते. याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

यावर्षी सरकारकडून (Government) दुसऱ्यांदा महागाई भत्ता जाहीर केला जाणार असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT