A.R Rahman Viral Video: तमिळमध्ये बोल, हिंदीत नाही ... ए. आर रहमानचा बायकोसोबतचा व्हिडिओ व्हायरल

गायक संगीतकार ए.आर रहमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
A.R. Rahman
A.R. Rahman Dainik Gomantak
Published on
Updated on

A.R Rahman Viral Video: संगीतकार एआर रहमान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वास्तविक तो एका कार्यक्रमात पत्नी सायरा बानो यांना हिंदीत बोलण्यापासून रोखत आहे. त्याने पत्नीला हिंदीऐवजी तामिळमध्ये बोलण्यास सांगितले. 

अलीकडेच, संगीतकार सायरासोबत चेन्नईमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाला होता. शोचा अँकर सायराला स्टेजवर बोलण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांच्या हातात पुरस्कारही दिसतो. काय आहे संपूर्ण गोष्ट चला पाहुया.

व्हायरल व्हिडिओमध्ये एआर रहमान आणि सायरा बानो स्टेजवर दिसत आहेत. यादरम्यान एआर रहमान तामिळमध्ये म्हणाला, "मला माझी मुलाखत पुन्हा पाहणे आवडत नाही.

ती पुन्हा पुन्हा व्हिडिओ प्ले करते आणि पाहत राहते कारण तिला माझा आवाज आवडतो." असं म्हणत सायरा बानो हसल्या. यानंतर अँकरने सायराला बोलण्यास सांगितले.

सायरा बानो प्रेक्षकांशी बोलण्यापुर्वीच एआर रहमान तिला म्हणाले, "तामिळमध्ये बोला, हिंदीत नाही." सायरा डोळे मिटून म्हणाली अरे देवा. प्रेक्षक हसले आणि टाळ्या वाजवू लागले.

 मग ती मोठ्या हसत इंग्लिशमध्ये सांगते की 'माझे तमिळ ते चांगले नाही'. मला तमिळ नीट बोलता येत नाही.' पण, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्हाला त्यात काही चुकीचं वाटणार नाही. तो बायकोची गंमत करतोय हे सहज लक्षात येईल.

A.R. Rahman
Ponniyin Selvan 2: या 5 कारणांसाठी बिग स्क्रिनवर पोन्नियन सेल्वन पाहाच...

एका मुलाखतीत आपल्या लवस्टोरीबद्दल सांगताना सायरा बानो म्हणाल्या होत्या की, जेव्हा तिचे लग्न निश्चित झाले तेव्हा तिने एआर रहमानला फक्त दोन गोष्टी विचारल्या.

त्याने विचारले होते, लग्नानंतर मी इंग्रजीत बोलू शकतो का? मला गाडी चालवण्याची परवानगी मिळेल का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com