पाणीपुरीवरुन कडाक्याचं भांडण; बायकोने विष प्राशन करुन केली आत्महत्या

पाणीपुरी न विचारताच आणल्यानं पुण्यातील (Pune) महिलेने पतीसोबत कडाक्याचं भांडण केले. त्यानंतर दोन दिवसांमध्ये या महिलेने स्वतःच आयुष्य संपवलं.
Panipuri
PanipuriDainik Gomantak
Published on
Updated on

पाणीपुरी (Panipuri) तरुणांपासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मात्र पुण्यात पाणीपुरीवरुन असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. 'मला न विचारताच तुम्ही पाणीपुरी आणलीच कशी?' या शुल्लक कारणांवरुन थेट बायकोने विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीपुरी न विचारताच आणल्यानं पुण्यातील (Pune) महिलेने पतीसोबत कडाक्याचं भांडण केले. त्यानंतर दोन दिवसांमध्ये या महिलेने स्वतःच आयुष्य संपवलं.

संसारात भांड्याला भांड लागतचं. पती पत्नीमध्ये कोणत्या कारणावरुन खटके उडतील हे काही सांगता येत नाही. मग अशाच छोट्या मोठ्या कुरबुरीमधून कधी कधी जिवाला घोर लावणाऱ्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यामधील आंबेगाव पठारमध्ये घडली आहे. प्रतिक्षा गहिनाथ सररवदे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तसेच गहिनाथ असे पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Panipuri
मंदिरे उघडा अन्यथा राज्यभर घंटानाद करु: राज ठाकरे यांचा इशारा

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा आणि गहिनाथ यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. ते दोघेही उच्चविद्याविभूषित आहेत. त्याचबरोबर या दांमत्याला एक गोंडस मुलगाही आहे. मात्र मागील काही वर्षापासून या दांम्पत्यांमध्ये किरकोळ कारणांवरुन सातत्यानं खटके उडत होते. गेल्या आठवड्यामध्ये असाच किरकोळ वाद या दांम्पत्यांमध्ये झाला. गहिनाथ सरवदे हे नेहमीप्रमाणे कामावरुन येताना पाणीपुरी पार्सल घेऊन आले. मात्र पत्नीने मला न विचारताच पाणीपुरी कशी काय आणली, यावरुन प्रतिक्षाने गहिनाथ यांच्यात कडाक्यांचं भांडण झालं.

Panipuri
शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचविले : राज ठाकरे

त्यानंत पुढचे दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हते. या दांम्पत्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून किरकोळ कारणांवरुन वाद सुरुच होता. यातून प्रतिक्षा यांनी शनिवारी विष प्राशन केले. विष प्राशन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रतिक्षाचा रुग्णालयात उपचारादरम्यानच मृत्यू झाला. या प्रकरणी पती गहिनाथ सरवदेला पुणे पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com