Uddhav Thackeray: 'देशात बेबंदशाहीची सुरुवात झाली...', निवडणूक आयोगाच्या निकालावर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Bow and Arrow Symbol: बेबंदशाहीची सुरुवात झाली आहे. देशात पूर्णपणे लोकशाही संपली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Bow and Arrow Symbol: निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. याशिवाय, शिंदे गटाच्या गोटात शिवसेनेचे नावही आले आहे. गेल्या वर्षी ठाकरेंविरोधात बंड करुन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये धनुष्यबाण, पक्षाच्या चिन्हावरुन वाद सुरु होता. शिवसेना पक्षाची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले. यामध्ये मंडळातील सदस्यांना कोणतीही निवडणूक न घेता पदाधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. अशा पक्षरचनेमुळे विश्वासाला तडा जातो.

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केले. यावेळी त्यांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला. त्याचबरोबर अशा प्रकारचा निर्णय निवडणूक आयोगाने देऊ नये, असे यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Uddhav Thackeray
Uddhav thackeray: कर्नाटकबाबत भूमिका स्पष्ट करा; पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचे आव्हान

उद्धव ठाकरे म्हणाले की, या निर्णयावर काय बोलायचे असा प्रश्न पडला आहे. देशात बेबंदशाहीची सुरुवात झाली आहे. देशात पूर्णपणे लोकशाही संपली आहे. आज आलेला हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे मी म्हटले होते. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकालावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.

दुसरीकडे, शिवसेनेच्या मूळ घटनेत अलोकतांत्रिक पद्धती दडल्याचेही आयोगाने मान्य केले. त्यामुळे हा पक्ष एखाद्या खासगी मालमत्तेसारखा झाला आहे. निवडणूक आयोगाने 1999 मध्येच अशा पद्धती नाकारल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेवरील ठाकरे गटाचा दावा संपला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Speech: 40 रेडे, राज्यपाल, हिंदुत्व, शेतकरी; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

तसेच, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेवरील ठाकरे गटाचा दावा संपला आहे. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने शिंदे गट आणि शिवसेना वादावरील निर्णय 21 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. गेल्या महिन्यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदने सादर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com