Uddhav Thackeray Speech: 40 रेडे, राज्यपाल, हिंदुत्व, शेतकरी; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात शिवसेनेचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. ठाकरेंनी महाराष्ट्रासह देशातील राजकारणावर देखील भाष्य केले. जाणून घेऊया उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे.

Uddhav Thackeray
Jhund Actor: 'झुंड' चित्रपटातील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; चोरीत सहभागी असल्याचा आरोप

- आज काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. 40 रेडे मी नाही म्हटलं, त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतिर्थावरच शपथ घेतली. आमची कुलस्वामीनीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आयोध्येला गेलो होतो. हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला.

- गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील.

- छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊ पणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला.

Uddhav Thackeray
Goa Miles चालत नाही, कॅबची सुविधा नाही; कधी सुरू होणार ओला-उबर, मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

- खोके सरकार गादीवर आले आणि पनवती सुरु झाली. कसला नवस फेडता आणि शेतकरी दुर्लक्षित. अन्नदाता शेतकरी विचारतो खायच काय? पंतप्रधान म्हणतात मी दोन तीन किलो शिव्या खातो. तुमच ठिक आहे शिव्या खाऊन जगता पण शेतकऱ्यांचे काय?

- एका व्हिडिओत मुख्यमंत्री शेतात रमले आहेत. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि दहा लाख मिळवा. चिखल तुडवत जाणारे शेतकरी, कधीतरी डीपी जळते. हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जातो.

- शिवसेनेने काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडलं असे म्हणतात, मग भाजपने पीडीपीसोबत जाऊन काय केले? काँग्रेस भारत माता की जय म्हणते. मुफ्ती म्हणतात का वंदे मातरम आणि भारत माता की जय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com