Uddhav Thackeray | Shiv Sena News
Uddhav Thackeray | Shiv Sena NewsDainik Gomantak

Uddhav thackeray: कर्नाटकबाबत भूमिका स्पष्ट करा; पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचे आव्हान

सीमावादात मध्यस्थीचेही आवाहन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून चिघळला आहे. यावर केंद्राने भुमिका घ्यावी, सीमाप्रश्नावर मोदींनी मध्यस्थी करावी अशी अनेकांनी मागणीही केली आहे.आता याच प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी आधी कर्नाटकविषयीची भूमिका स्पष्ट करावी आणि नंतर बाळासाहेबांच्या नावाच्या महामार्गाचं उद्घाटन करावं ,असं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची जी अरेरावी सुरु आहे,त्यावरसुद्धा मोदींनी सडकून बोललं पाहिजे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर तुमची काय भूमिका असणार आहे, याची अख्खा महाराष्ट्र ( Maharashtra ) वाट बघतोय असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. जालनाच्या घनसावंगी येथे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनात करत असलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादावर वक्तव्य केले आहे. दरम्यान,कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी अमित शाहांना भेटल्याने काही फरक पडत नाही असे म्हटले होते. बोम्मईंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com