जावायाचा हायव्होल्टेज ड्रामा; गावभर झाला हंगामा

महाराष्ट्रातील (maharashtra) जालनामधील (Jalna) सोनखेडा गावातील नागरिकांना एक वेगळाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
Electric pole
Electric poleDainik Gomantak
Published on
Updated on

कौटुंबिक वाद किती टोकापर्यंत गेले पाहिजे हे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी त्या त्या परिस्थितीनुसार समजले पाहिजे. आणि त्यातच जावाई तर नाराज झाला तर मग काही विचारायची सोयच नाही. असच काहीस जालन्यात घडलं आहे. कौटुंबिक वादामधून सासुरवाडीच्या लोकांवर नाराज झालेला जावाई एवढ्या टोकापर्यंत त्याची नाराजी वाढली की, त्याने थेट महावितरणाच्या हायव्होल्टेज असणाऱ्या खांबावर जाऊन महाराष्ट्रातील (maharashtra) जालनामधील (Jalna) सोनखेडा गावातील नागरिकांना एक वेगळाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सायंकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने महावितरणाच्या 220 केव्हीच्या टॉवरवर चढत गावभर बोंब ठोकली.

Electric pole
Maharashtra Floods: पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून 700 कोटींची मदत

ही बोंब ऐकताच गावातील अबाल, वृध्द गावाच्या शिवारातील टॉवरकडे धावत सुटले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाह आले की, 35 वर्षांचा अज्ञात तरुण टॉवरवर चढल्याचं निदर्शनास आलं. गावातील लोक त्या तरुणाला खाली उतरण्याची विनंती करत होती. मात्र या तरुणाने या विनंतीला भीक न घातली नाही. दरम्यान गावातील एका व्यक्तीला संबंधित तरुण आपल्या गावाचा जावाई असल्याचं लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

Electric pole
बळीराजाला आता घर बसल्या आपल्या पिकांचे करता येणार रजिस्ट्रेशन

टॉवरवर चढलेल्या या तरुणाचे नाव मंगेश शेळके असे आहे. तो ही जालना जिल्ह्यातील कोळगाव येथील रहिवासी आहे. मंगेशचा सोनखेडा गावातील मुलीशी 5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दरम्यान गुरुवारी तो माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी सोनखेडाला आला होता. ज्यात मंगेशचा पत्नीबरोबर सासुरवाडीच्या इतर नातेवाईकांसोबत वाद झाला आणि या वादातून त्याने हे पाऊलं उचललं.

Electric pole
आता फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराबाबत आता तक्रार करता येणार; वाचा सविस्तर 

दरम्यान बराच वेळ होऊनही हा मंगेश खाली उतरत नसल्याने त्याच्या पत्नीसह नातेवाईकांनी लोकांना या ठिकाणी बोलविण्यास सुरुवात केली. मात्र त्यासही जावाई जुमानत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर पोलिसांना बोलावलं, सगळ्यात आगोदर पोलिसांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधत लाईट नसल्याने बंद असलेला विजेचा प्रवाह पुन्हा चालू न करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान गावकरी, पोलिस आणि सासुरवाडीच्या या तरणांला खाली येण्याच्या अनेकदा विनवण्या सुरुच ठेवल्या. अखेर तब्बल चार तासानंतर मंगेश टॉवरवरुन खाली उतरला आणि गावकरी तसेच कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com