आज जगभरातील करोडो लोक फेसबुकचा, ट्वीटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करत आहेत. मात्र दिवसेंदिवस या सोशल मिडियाचा गैरवापरही वाढत चालला आहे. अश्लील फोटो टाकणे, आक्षेपार्ह मजकूर टाकणे , फेक अकाऊंट तयार करणे, असे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशा आक्षेपार्ह गोष्टींबाबत आता फेसबुकने मोठा निर्णय घेतला आहे. आता फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराबाबत फेसबुक युजर्सला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मॉनिटरिंग बोर्डाकडे तक्रार करता येणार आहे, अशी माहिती फेसबुकचे स्वतंत्र मॉनिटरींग बोर्ड क्वासी यांनी दिली आहे. (Offensive content on Facebook can now be reported; Read detailed)
इतरांनी अपलोड केलेल्या पोस्टवर आक्षेप घेणार्या आणि फेसबुकची अपील प्रक्रिया आधीच पूर्ण केलेल्या वापरकर्त्यांची तक्रार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मॉनिटरिंग बोर्डाकडे करता येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मॉनिटरिंग बोर्ड या पोस्टमधील आक्षेपार्ह मजकुराची नोंद घेईल आणि त्यावर कारवाई करेल. आतापर्यंत केवळ अशा वापरकर्त्यांना आक्षेप घेण्याचा अधिकार आहे, ज्यांची सामग्री फेसबुकनेच काढली आहे.
फेसबुकने गेल्या वर्षी हे पॅनेल तयार केले होते, जे आक्षेपार्ह मजकुरावर कारवाई करते. कंपनी नियमितपणे हजारो पोस्ट्स आणि खाती काढून टाकते. बोर्डाच्या निर्मितीच्या पहिल्याच दिवशी सुमारे तीन लाख तक्रारी करण्यात करण्यात आल्या होत्या. परंतु आता जगभरातील अनेक वापरकर्त्यांवर परिणाम होण्याची भीती असलेल्या या प्रकरणांना बोर्ड प्राधान्य देत असल्याचे पर्यवेक्षण मंडळाचे प्रमुख थॉमस ह्युजेस यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.