Sharad Pawar: आजारी असतानाही पक्षाच्या बैठकीसाठी शरद पवार हेलिकॉप्टरने मुंबईतून शिर्डीत

कार्यकर्त्यांच्या आग्रहाला दिला मान; बैठकीनंतर पुन्हा गाठले मुंबईतील रूग्णालय
Sharad Pawar
Sharad Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) शनिवारी पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी शिर्डीत पोहचले. तथापि, गेले काही दिवस पवारांवर मुंबईतील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवारांनी रूग्णालयातून थेट शिर्डी गाठली.

Sharad Pawar
Aditya Thackeray: शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार

शरद पवारांना गेल्या काही दिवसांपासून ताप आहे. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी शरद पवार हे शिर्डीत सुरू असलेल्या पक्षाच्या बैठकीत मुंबईतील रूग्णालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. शनिवारी दुपारी मात्र तिथूनचे ते पक्षाच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीला आले.

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरून एका हेलिकॉप्टरद्वारे पवारांनी शिर्डी गाठली. यावेळी त्यांच्यासमवेत डॉक्टरांचे एक पथकही होते. शिर्डीतील कार्यक्रमानंतर ते पुन्हा हेलिकॉप्टरद्वारे मुंबईत परतले आणि रूग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी पवारांना पुढील 10 ते 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Sharad Pawar
Elon Musk Twitter Account: आता काय म्हणाल? खुद्द एलन मस्कचेच ट्विटर अकाऊंट झाले हॅक; चक्क भोजपुरी भाषेत ट्विटस!

पक्षाचे कार्यकर्तेच संघटना बळकट करत असतात आणि कार्यकर्तेच राजकीय बदल घडवतील, असा विश्वास शिर्डीतील बैठकीत केलेल्या भाषणात पवारांनी व्यक्त केला. आजारी असल्याने या बैठकीत पवारांना जास्त वेळ बोलता आले नाही. त्यामुळे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांचे उर्वरीत भाषण वाचून दाखवले.

शरद पवार सध्या 81 वर्षांचे आहेत. ते म्हणाले की, पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती, मी बैठकीला यावे. या बैठकीत पक्षाची विचारसरणी, पुढील काळातील कार्यक्रम, धोरणांवर चर्चा होणार होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com