Aditya Thackeray: शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार

आदित्य ठाकरेंचे वक्तव्य; फडणवीस यांची या सरकारमध्ये फजिती झाली
Aditya Thackeray
Aditya ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Aditya Thackeray: शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे विविध मुद्यांवर मते व्यक्त केली. त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांवर निशाणाही साधला.

Aditya Thackeray
Sanjay Raut Bail: संजय राऊतांना दिलासा नाहीच; 9 नोव्हेंबरला होणार सुनावणी

आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरे यांनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्या सर्वांना आमचे समजत होतो. गेल्या 40 ते 50 वर्षात मुख्यमंत्र्यांकडे असलेले महत्वाचे नगरविकास खाते आम्ही त्यांना दिले. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण ते पाठीमागून वार करतील, असे वाटले नव्हते. आम्ही सत्तेत असताना विरोधी नेत्यांवर कधी पाळत ठेवली नाही किंवा तडीपारीच्या नोटीस दिल्या नाहीत. पण आता तसे होत आहे. फुटलेले सर्व गद्दार आहेत. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, आम्ही ही निवडणूक लढवू. सत्य समोर येईल.

Aditya Thackeray
PM Narendra Modi : महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना केंद्राची मंजुरी; रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपद अडीच-अ़डीच वर्षे ठरले होते. ते वचन पाळले असते तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले नसते. ते मुख्यमंत्री झाले असते. देवेंद्र फडणवीस अनुभवी नेते आहेत. फडणवीस यांची या सरकारमध्ये फजिती झाली आहे. ते या सरकारमध्ये अजून कसे आहेत, याचे आश्चर्य वाटते. त्यांचे ट्रोलिंग केले जाते तेव्हा मला वाईट वाटते.

विशेष या संपुर्ण कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली नाही. मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. आमचे सरकार असताना केंद्र सरकारशी आमचे उत्तम संबंध होते. पण आता राज्यातून अनेक प्रोजेक्ट बाहेर गेले आहेत. हे राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com