Elon Musk Twitter Account: ट्विटर खरेदी केल्यापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क खूप चर्चेत आहेत. ट्विटरशी संबंधित अनेक महत्वाच्या घडामोडींची माहिती ते ट्विट करूनच देत आहेत. पण आता चक्क मस्क यांच्या अकाऊंटवरूनच विचित्र ट्विट केले जात आहेत. अशा ट्विटमुळे मस्क यांचे अकाऊंट हॅक झाले आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
एलन मस्क यांच्या अकाऊंटवरून चक्क हिंदी आणि भोजपुरी भाषेतून ट्विट्स होऊ लागले आहेत. ते वाचून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे. नेटकऱ्यांनीही लागलीच ही ट्वीट मोठ्या प्रमाणात रिट्विट केली आहेत.
अशी विचित्र ट्विट मस्क यांच्या अकाऊंटवरून येऊ लागल्याने नेटकऱ्यांची यात आणखी रूची वाढली. त्यामुळे एलन मस्क यांच्या या अकाऊंटला लोकांना मोठ्या प्रमाणात फॉलो करायला सुरवात केली. हे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यापुर्वी या अकाऊंटला 97 हजार फॉलोअर्स होते.
तथापि, हे एलन मस्क यांचे खरे ट्विटर अकाऊंट नव्हते. तर @iawoolford या ट्विटर युजरने स्वतःचे नाव बदलून एलन मस्क असे केले होते. त्यने ट्विटरवरील डीपी आणि कव्हर फोटो देखील एलन मस्क यांच्या ट्विटर अकाऊंटप्रमाणेच होता. त्यामुळे नेटकरी कन्फ्युज झाले. अर्थात दोन्ही अकाऊंटवर काही गोष्टी भिन्न होत्या, ज्या बदलल्या जाऊ शकत नाहीत. या अकाऊंटवरून केले गेलेले ट्विटस आणि मीम्स पाहून तुम्ही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.