मातोश्रीवर येणार का राहुल गांधी? राऊत आणि गांधींच्या भेटीत काय ठरलं

सोमवारी रात्री संजय राऊत (Sanjay Raut) आणि राहुल गांधी यांच्यात भेट झाल्याचे समजते आहे.
Rahul Gandhi and Sanjay Raut
Rahul Gandhi and Sanjay RautDainik Gomantak

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाची भुमिका असलेले शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात भेट झाली की चर्चेला उधान यायचे. मात्र यावेळी एका वेगळ्याच भेटीची चर्चा सुरु आहे. कारण यावेळी संजय राऊत यांच्या सोबत दिसले कॉंग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी. ही भेट का झाली असेल? या भेटीचा हेतु काय असेल? असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिले जातायं.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात भेट झाली. संजय राऊत यांनी राहुल गांधींनी भेटीसाठी आपल्या घरी बोलावले असल्याचे सांगितले होते. यावेळी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे देखील समजते आहे.

या भेटीत राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात माध्यमांच्या आजच्या परिस्थितीबद्दल चर्चा झाल्याचे बोलले जाते आहे. या चर्चेत राहुल गांधी यांनी राऊत यांच्याकडून पत्रकारीतेबद्दल काही माहीती देखील घेतली. या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या दिवशी झालेला पहायला मिळाला.

Rahul Gandhi and Sanjay Raut
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर

राहुल गांधी हे संसदेच्या परिसरात माध्यमांपासुन दुर जाताना दिसत होते. त्यावेळी संजय राऊत यांनी राहुल गांधींना ‘आप दो शब्द बोलो... वो लोग आपकी राह देख रहे थे’ विशेष म्हणजे त्यानंतर राहुल गांधी माध्यमांशी बोलले देखील. हा सर्व परिणाम कालच्या बैठकीचा होता.

संजय राऊत राहुल गांधींच्या निवासस्थानी गेले, त्यांच्यात चर्चा देखील झाली. तसेच या भेटीत संजय राऊत यांनी गांधींना 'महाराष्ट्रात आपलेच सरकार आहे, तुम्ही महाराष्ट्रात या..आम्ही एक कार्यक्रम आयोजित करु त्यावेळी तुम्ही या' असे म्हणत आमंत्रण दिले. मात्र आता राहुल गांधी मातोश्रीवर येतात का हे येणाऱ्या काळातच समजणार आहे. या भेटीवरुन आता आगामी काळात शिवसेना आणि कॉंग्रेसच्या राजकीय समीकरणांवर देखील चर्चा होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com