महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर

पूरग्रस्तांसाठी 11, 500 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
Udhav Thackeray
Udhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

राज्य मंत्रिमंडळामध्ये (State Cabinet) बैठकीमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी 11, 500 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. पूरामध्ये ज्या नागरिकांच्या घरांचं पूर्ण नुकसाना झालं त्यांना 1.50 लाखाची मदत , त्याचबरोबर प्रत्येक घरासाठी 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच दुकानदारांना 50 हजार रुपये तर टपरीधारकांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.पूरग्रस्त व्यापाऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात गेले काही दिवस पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) अखेर विश्रांती घेतली आहे. परंतु पावसाच्या रौद्ररुपाने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरीसह इतर जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर कुठे नदीला आलेल्या महापूरामुळे पूरपरिस्थीती ओढावली. अशा परिस्थीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांनी श्रमदान आणि आर्थिक सहाय्य पुरवत या पूरग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

Udhav Thackeray
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाविवाद एक संपलेला अध्याय

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पूरग्रस्तांसाठी या मोठ्या पॅकेजची घोषणा केली. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात दरडी कोसळून मोठं नुकसान झाले. त्यावर सविस्तर दिर्घकालीन योजना आपण आखत आहोत. 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याच आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com