जे वैफल्य ग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या पदरी शेवटपर्यंत निराशाच येते. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली, भाजप जागतिक स्तरावरचा पक्ष आहे, उद्या उठून ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं देखील ते सांगू शकतात. पण काही जरी झालं तरी महाराष्ट्रात (Maharashtra) त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणारच नाही.
तोपर्यंत भाजप राहिल की नाही याची माहीत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे. 2024 मध्ये ज्या निवडणूका होणार आहेत, त्यातही दिल्लीच चित्रं बदलून जाईल. त्यांनी महाराष्ट्रला आता विसरून जावं. ठिक आहे 100 लोकं जिंकतील, 75 लोकं जिंकतील अजून काही करतील पण महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) हेच या महाराष्ट्राचे भविष्य असणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
यावेळी त्यांनी हे विधान केलं. युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर कमेंट करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजप युतीत आम्ही थोडंफार एकत्र होतो. एकत्र नांदलो. हे जे काही नातं होतं ते भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त लोकं असतात, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.
शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी नगराध्यक्ष जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे. त्यावरतीही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे चांगले पाऊल आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन ही भूमिका घेतली आहे. स्थानिक राजकारणाच्या नावाखाली अनेकदा भ्रष्ट हातमिळवण्यात होतात. युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी त्या केल्या होत्या. अशा प्रकारची मनमानी आता चालणारच नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) त्यांच्या 23 जानेवारीच्या भाषणात स्पष्ट संदेश आणि संकेत दिले आहेत की, शिवसेनेकडून असं काही होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दक्षता घ्यावी. नगरपरिषदेत सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे, असही राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचा निवडणूक अर्ज बाद झाला आहे. त्यावरूनही त्यांनी हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण तिकडे भाजप अडचणीत आहे. त्यामुळे ते आमच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. आयोग साधी सुनावणीही करत नाही. पुरावे समोर ठेवले तरी सुनावणी घ्यायला तयार नाही. मेरठ, मथुरास, बिजनौर, नोएडा उमेदवार गेले, ही मनमानी आणि हुकूमशाही आहे. निवडणूक आयोग त्यांचा गुलाम झाल्याचं लक्षण आहे, असा हल्ला त्यांनी चढवला आहे.
‘झुकेंगे नही’ हा पुष्पा चित्रपटातील डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. ‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या 50 वर्षापासूनचा नारा आहे. संजय राऊतांचा तर तो नाराच आहे. कशाला झुकायचं? का झुकायचं? आमचे काही उमेदवार बाद झाले असतील पण आम्ही लढू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.