राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकांसोबत पार्टनरशिप: किरीट सोमय्या

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या परिवाराने वाईन व्यावसायिकांसोबत बिजनेस पार्टनरशीप केली आहे, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवरती निशाणा साधला.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरती निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन (Wine) व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, राऊतांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिजनेस पार्टनरशीप केली होती. संजय राऊतांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे.

Sanjay Raut
चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री ठाकरे काय देणार उत्तर?

किरीट सोमय्या यांनी पुढे म्हटले की, मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊतांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय देखील आहे. 16 एप्रिल 2021 रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या आहेत. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊतांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.

सोमय्या यांनी मॅगपी कंपनीबाबत अधिक माहिती देत म्हटले की, मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक 100 कोटी एवढी आहे. कंपनीने 2 जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला कळवले होते. त्यानंतर राज्य सरकारने (State Government) सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवरती केला आहे.

Sanjay Raut
Maharashtra Supermarket मध्ये वाईन विक्रीचा निर्णय ठरणार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

इतकेच नाही तर, वैजनाथ देवस्थानची जमीन ठाकरे सरकारने हडप केली. त्या जमिनीवर तहसीलदार वर दबाव आणत आहेत. ठाकरे सरकारचा वैजनाथ देवस्थान जमीन मध्ये थेट संबंध आहे, असा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com