नथुराम गोडसेंनी केला महात्मा गांधींचा वध, नाना पटोलेंचं वादग्रस्त विधान

नथुराम गोडसेंनी महात्मा गांधी यांचा वध केला असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.
Nana Patole
Nana PatoleDainik Gomantak
Published on
Updated on

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनीमीत्त काँग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें यांच्या कडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधी यांचा वध केला असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना नाना पटोले यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान यावरुन पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Nana Patole
राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकांसोबत पार्टनरशिप: किरीट सोमय्या

पटोलेंच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक -
नाना पटोले(Nana Patole) यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. नाना पटोले यांना मानसिक स्थिती बिघडलेली आहे, असा टोलाही भाजपकडून लगावण्यात आला आहे. नाना पटोले यांच्या मनातील शब्द ओठावर आले का? असा प्रश्न विधानपरीषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, नटवरलाल नाना पटोलेंवर मानसिक उपचार होणे आवश्यक आहे, त्यांनी लवकर उपचार सुरु करावेत. ते जाणीवपुर्वक वक्तव्य करत असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com