रत्नागिरीत 'ब्रेक द चेन' चे निर्बंध शिथील

जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील (Collector Dr. B.N., Patil) यांनी कोरोनाला रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
Lockdown
LockdownDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचं संक्रमण (Covid 19) काही प्रमाणात निंत्रणात येत असतानाच जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील (Collector Dr. B.N., Patil) यांनी कोरोनाला रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आजपासून जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यांतील दुकाने, उपहार गृहे, शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र कोरोना लसीकरण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

Lockdown
COVID-19: आता महाराष्ट्रात प्रवेश करताना या अटी बंधनकारक

शिवाय राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत अद्याप कोणत्याही प्रकारची घट झालेली नाही. त्यामुळे राज्यात कोरोना प्रतिंबधक उपाययोजनांची गरज भासत आहे. त्याच अनुषंगाने राज्यभरात कोरोनाचे नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. रत्नागिरीमध्ये 15 ऑगस्ट 2021पासून ते राज्य शासनाकडून कोरोनासंबंधीचे नवे निर्देश येईपर्यंत खालील प्रमाणे निर्देश लागू राहणार आहेत.

Lockdown
महाराष्ट्रात प्रवेश करण्यापुर्वी जाणुन घ्या काय आहेत नियम व अटी

हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु

हॉटेल, बिअर बारमध्ये मास्कचा वापर करणे अनिवार्यन असणार आहे. त्याचबरोबर हॉटेल, बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य असणार आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीच्या दोन मात्र घेतल्या आहेत तेच कर्मचारी काम करु शकणार आहेत.

शिवाय, जिल्ह्यातील जिम्नॅशिअम, योगसेंटर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासह इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे आणि तिथे काम करणारे कर्मचारी आणि व्यवस्थापक यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन मात्रा घेतल्या असतील तरच त्यांना परवानगी असणार आहे.

Lockdown
COVID-19: महामारीमुळे सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रात

शासकिय आस्थापना राहणार सुरु

जिल्ह्यातील सर्व शासकिय, निमशासकिय आस्थापनाचे कर्मचारी त्याचबरोबर रेल्वे, बॅंक कर्मचारी यांनी कोरोना प्रतिंबंधक लस घेणे आवश्यक असणार आहे. ज्या औद्योगिक आस्थापनांनी पूर्णपणे लसीकरण केलेले आहे ते पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मैदाने, चौपाट्या, समुद्रकिनारे हे स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या वेळेतच सुरु राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com