कोरोना (COVID-19) महामारीच्या (the epidemic) काळात राज्यात सर्वात जास्त फटका बसला तो म्हणजे उद्योगांना त्यामुळे लाखो लोकांना आपल्या नोकऱ्या (Jobs) गमवाव्या लागल्या आहेत. बेरोजगारीचा सर्वाधिक फटका (The biggest blow to unemployment) बसला तो महाराष्ट्राच्या (Maharashtra) शहरी भागाला, या भागात एप्रिल-जूनमध्ये 35.6 टक्के तर जुलै ते सप्टेंबर 2020 मध्ये 22.6 टक्के इतकी बेरोजगारीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या सरासरी दारापेक्षा शहरी भागामध्ये बेरोजगारी अधिक वाढली आहे.
जुलै ते सप्टेंबर 2020 या काळातील मनुष्यबळाचा तीन महिन्यांचा अहवाल समोर आला असून त्यामध्ये झारखंडमध्ये बेरोजगारीचा दर एप्रिल-जूनमध्ये 32 टक्के तर जुलै ते सप्टेंबरमध्ये 11.8 टक्के होता. तज्ज्ञांच्या मते चालू साप्ताहिक दरात दर आठवड्याला व्यक्तीच्या रोजगाराची स्थिती समोर येत असते, जर कोणाला काम मिळले नाही तर रोज एक तासांनंतर याची नोंद घेण्यात येते. केरळात दोन तिहमहीत बेरोजगारी दर 27.3 टक्के आणि 18.9 टक्के होता.
बेरोजगारीत चौथ्या स्थानावर जम्मू-काश्मीर हे राज्य आहे. तेथे पहिल्या तिमहीत म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये हा दर 17.4 टक्के होता. त्या खालोखाल ओडिसा आणि तेलंगणात बेरोजगारी दर अनुक्रमे 16.5 आणि 15.4 टक्के इतका होता. पीएलएफएसच्या अहवालानुसार दिल्लीमध्य़े एप्रिल ते जून 2020 या काळात हा दर 10.5 टक्के इतका कमी होता. तर जुलै-सप्टेंबरमध्ये तो आणखीन खाली आला याकाळात दिल्लीत बेरोजगारी दर 4.5 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. पुरुष आणि महिलांमध्ये बेरोजगारीचा दर पहिल्या तिमाहीच्या तुलनेत म्हणजेच एप्रिल-जूनमध्ये पुरुषांचा 12.6 टक्के तर महिलांचा 15.8 टक्के झाला आहे. तर जुलै ते सप्टेंबरमध्ये पुरुषांचा 20.8 तर महिलांचा 21.2 टक्के होता.
2019 च्या जुलै-सप्टेंबर या कालावधीत बेरोजगारी दर पुरुषांचा 8 तर महिलांचा 9.7 टक्के इतका होता. कामगार सहभाग दर हा लोकसंख्येच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सर्व वयोगटामध्ये 37 टक्के होता तर गेल्या तिमहिमध्ये तो 35.9 टक्के झाला. जानेवारी ते मार्च 2020 ला हाच दर 37.5 टक्के होता. गेल्या वर्षीच्यातुलनेत जुलै-सप्टेंबर 2020 मध्ये 28.4 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षात जानेवारी ते मार्च या कालावधीत तो 34.1 टक्क्यांपर्यांत होता. जुलै 2019 ते 2020 या एका वर्षाच्या कालावधीत हा दर 8.8 टक्के इतका होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.