महाराष्ट्रात प्रवेश करण्यापुर्वी जाणुन घ्या काय आहेत नियम व अटी

Maharashtra: लेव्हल थ्री मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांसाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागु केलेले जुन्या आदेशानुसारचे निर्बंध कायम आहेत.
Rules and Regulations for travelling in Maharashtra
Rules and Regulations for travelling in Maharashtra Dainik Gomantak
Published on
Updated on

देशात सध्या कोरोना (Covid-19) महामारीच्या तिसऱ्या लाटेचे सावट असातानाच महामारीशी लढण्यासाठी महत्वपुर्ण असणारी लसीकरणाची मोहीम सुद्धा सुरु आहे. एप्रिलच्या मध्यावधीत तीव्र झालेली कोरोना महामारीची तिसरी लाट आता ओसरत असल्याने देशाच्या अनेक राज्यांत आता निर्बंध शिथील होताना दिसता आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने 1 ऑगस्टला जाहीर केलेल्या 4 ऑगस्टपासुन लागु होणाऱ्या नियमांनुसार मुंबई आणि ठाण्यात निर्बंध शिथील केले आहेत. तसेच राज्यातील 36 पैकी 22 जिल्ह्यांना हे निर्देश लागु होणार आहेत. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी 4 जून 2021 रोजी जारी केलेल्या 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागु केलेले निर्बंध कायम आहेत. (Travelling to Maharashtra: Read these rules before you pack your bags)

सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करू शकता का?

राज्यभरात बसने प्रवास करण्यास परवानगी आहे, परंतु कोरोना संसर्ग असलेल्या म्हणजेच शासनाने निश्चित केलेल्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यावर निर्बंध आहेत. यामध्ये विशेषत: लोकल ट्रेनद्वारे होणाऱ्या प्रवासात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच सुट देण्यात आली आहे. सोमवारी, 2 ऑगस्टरोजी मुंबई हायकोर्टाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (DMA) वकिलांसाठी ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना, लसीकरण पुर्ण झालेल्या लोकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यावर विचार करण्यास सांगितले आहे.

रेस्टॉरंटमध्ये जाता येऊ शकेल का?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आवश्यक आणि अनावश्यक सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे, मात्र मॉल्स बंद राहणार आहेत. तर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी आहे. सिनेमा, शाळा आणि नाट्यगृहे बंद राहतील.

Rules and Regulations for travelling in Maharashtra
गणपती स्पेशल ट्रेन: कोकणासाठी 150 ज्यादा गाड्या

प्रवास करताना या गोष्टी माहित असणे आवश्यक

महाराष्ट्रालात प्रवेश करण्यापुर्वी 72 तासांच्या आतला कोरोना नकारात्मक RT-PCR अहवाल आवश्यक आहे. तसेच लसीकरण पुर्ण झालेले असेल, तर प्रवास सुरु करण्याच्या 15 दिवस आधी तुमचे लसीकरण पुर्ण झाले असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवा.

सार्वजनिक वाहतूक

अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान प्रवास प्रतिबंधित आहे. लेव्हल 3 मध्ये असलेल्या भागात बसमध्ये उभे राहुन प्रवास करण्यास परवानगी नाही, तसेच अजून लोकल ट्रेन नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com