Ratnagiri: ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल, समुद्रात चार पर्यटकांचा बुडून मृत्यू; तीन सख्ख्या बहिणींचा समावेश

Ratnagiri Sea Tagedy: आरे-वारे समुद्रात शनिवारी (१९ जूलै) सायंकाळी एक ह्रदयद्रावक दुर्घटना घडली. समुद्रात चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला.
Ratnagiri
RatnagiriDainik Gomantak
Published on
Updated on

रत्नागिरी : आरे-वारे समुद्रात शनिवारी (१९ जूलै) सायंकाळी एक ह्रदयद्रावक दुर्घटना घडली. मुंबईतील मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी आणि त्यांचा जावई यांच्या बुडून मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेत उज्मा शमसुद्दीन शेख (१८), हुसेरा शमसुद्दीन शेख (२०), जेनब जुनेद काझी (२८) व जेनब यांचे पती जुनेद काझी (३०) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समोर आलेल्या, शमसुद्दीन शेख हे दुबईमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असून त्यांच्या सुट्टीनिमित्त भारतात आलेल्या मुलींनी व जावयाने १९ जुलै रोजी आरे-वारे समुद्रकिनारी सहलीचा बेत आखला होता. मात्र, समुद्राच्या लाटांची तीव्रता आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला,

Ratnagiri
Goa Assembly : 'गोरगरिबांना परवडणारी घरे देण्‍याची प्रक्रिया सुरू', CM सावंतांचे स्पष्टीकरण; 'लिलाव प्रक्रिया बंद करा', तुयेकरांची मागणी

दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. अखेर सर्व मृतदेह सापडले.

Ratnagiri
Goa Education: गोव्यात 838 शिक्षकांची पदे रिक्त! मुख्‍यमंत्र्यांच्‍या उत्तरातून उघड; सरकारी शाळांत 592 कंत्राटी शिक्षक

या दुर्घटनेमुळे आरे-वारे किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात समुद्रात उतरण्याचे धाडस जीवावर बेतू शकते, याचा कटाक्षाने विचार करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com