Goa Education: गोव्यात 838 शिक्षकांची पदे रिक्त! मुख्‍यमंत्र्यांच्‍या उत्तरातून उघड; सरकारी शाळांत 592 कंत्राटी शिक्षक

Teacher Vacancies In Goa: शाळांमध्‍ये शिक्षकांच्‍या ८३८ जागा रिक्त आहेत. तर, ५९२ शिक्षक कंत्राटी किंवा रोजंदारीवर शिकवत असल्‍याचे विधानसभेतील लेखी प्रश्‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.
Goa School News, Goa Education News
Goa Education NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक तसेच उच्च माध्‍यमिक शाळांमध्‍ये शिक्षकांच्‍या ८३८ जागा रिक्त आहेत. तर, ५९२ शिक्षक कंत्राटी किंवा रोजंदारीवर शिकवत असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

आमदार व्‍हेंझी व्‍हिएगश आणि विजय सरदेसाई यांनी यासंदर्भातील प्रश्‍न विचारले होते. सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिकमध्‍ये शिक्षकांच्‍या किती जागा रिक्त आहेत आणि त्‍या भरण्‍यासाठी सरकारकडून कशापद्धतीने प्रक्रिया सुरू आहे, असे प्रश्‍न आमदार व्‍हिएगश यांनी विचारले होते.

त्‍यावरील उत्तरात सरकारी प्राथमिक शाळांत शिक्षकांची ३४७, प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची १४, सहाय्‍यक शिक्षकांची २०८, चित्रकला शिक्षकांची २९, कॉम्‍प्‍युटर शिक्षकांची ३, सहाय्‍यक जिल्‍हा शिक्षण निरीक्षकांची २११ आणि उच्च माध्‍यमिकमध्‍ये मुख्‍याध्‍यापकांची २६ पदे रिक्त असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी म्‍हटले आहे.

Goa School News, Goa Education News
Goa Education: गोव्यातील विद्यार्थी भाषा, गणितात कच्चे! सरकारचे लक्ष तिसरीवर; शिक्षण संस्‍था प्रमुखांची लवकरच होणार बैठक

सरकारी शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्‍याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे. सरकारी प्राथमिकमधील ३१८ शिक्षक, १४ प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक तसेच ११८ सहाय्‍यक शिक्षक भरण्‍यासाठीचा प्रस्‍ताव शिक्षण खात्‍याने कर्मचारी भरती आयोगाकडे पाठवला आहे. तर, सहाय्‍यक जिल्‍हा शिक्षण निरीक्षकांच्‍या १११ पदांच्‍या भरतीचा प्रस्‍ताव लोकसेवा आयोगाकडे पाठवण्‍यात आला आहे. २१ मुख्‍याध्‍यापकांच्‍या जागी थेट भरतीचा प्रस्‍ताव लोकसेवा आयोगाकडे असून, त्‍यावरील प्रक्रिया सुरू असल्‍याचेही मुख्‍यमंत्र्यांनी उत्तरात नमूद केले आहे.

Goa School News, Goa Education News
Goa Education: आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे शिल्पकार! त्यामुळे 8वी पासून कौशल्य विकासचा अभ्यासक्रमात समावेश; CM सावंत

१,५८५ शिक्षक कायमस्वरूपी

आमदार विजय सरदेसाई यांनी एका प्रश्‍नात सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक अशा एकूण ८१३ सरकारी शाळांमध्‍ये किती शिक्षक कायमस्वरूपी, कंत्राटी आणि रोजंदारीवर काम करीत आहेत, असा प्रश्‍न विचारला होता. त्‍यावरील उत्तरातून सरकारी शाळांत ५९२ शिक्षक कंत्राटी किंवा रोजंदारीवर शिकवत असल्‍याचे समोर आले आहे. सरकारी शाळांत १,५८५ शिक्षक कायमस्वरूपी, ६५ कंत्राटी आणि ५२७ रोजंदारीवरील शिक्षक असल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com