PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; संत तुकाराम शिला मंदिराचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संत तुकाराम महाराज मंदिरात शिला मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.
PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; संत तुकाराम शिला मंदिराचे करणार उद्घाटन
Dainik Gomantak
Published on
Updated on

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या देहूगाववासीय पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, पंतप्रधान आज संत तुकाराम महाराज मंदिरात शिला मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. मोदी आज दुपारी एकच्या सुमारास देहूला पोहोचण्याची शक्यता आहे. मंदिर परिसरापासून काही अंतरावर आयोजित केलेल्या जाहीर सभेलाही ते संबोधित करतील. यानंतर ते मुंबईतील राजभवन येथे जलभूषण भवन आणि क्रांती दालनाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित असणार आहेत. मुंबई समाचारच्या द्विशताब्दी सोहळ्याला ते उपस्थित असणार आहेत. (Prime Minister Narendra Modi to visit Maharashtra today)

PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; संत तुकाराम शिला मंदिराचे करणार उद्घाटन
'5 हजार स्वातंत्र्य सैनिकांची गांधी कुटुंबाने संपत्ती हडपली', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी विद्यासागर राव (C. Vidyasagar Rao) यांच्या कार्यकाळामध्ये राजभवनात भूमिगत तळघर सापडले होते. तर या तळघरात क्रांती दालन उभारण्यात आले आहे, या दालनात चापेकर बंधूंसह सावरकरांची चित्रे लावण्यात आली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये (Government) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रदीर्घ काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका स्टेजवर बसणार आहेत. गेल्या एप्रिल मध्ये लता मंगेशकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये आले होते, त्यादरम्यान कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्हते. (PM Narendra Modi Maharashtra Visit)

देहूच्या कार्यक्रमाला उद्धव येणार नाहीत

देहू संस्थान प्रशासनाला पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात प्रोटोकॉलची माहिती नव्हती. मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार असल्याचे भाजप नेते महेश लांडगे यांनी सांगितले आहे. लांडगे म्हणाले की, 'हे राजकीय भाषण होणार नाहीये हे वारकऱ्यांबद्दल असणार आहे, कारण 20 जूनपासून देहू येथून 'वारी'ला सुरू होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

1 कोटी खर्चाचे मंदिर 6 वर्षात बांधले आहे

देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख नितीन मोरे यांनी सांगितले की, भक्तांच्या देणगीतून एक कोटी रुपये खर्चून हे 'शिला' मंदिर बांधण्यात आले. “आम्ही राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. मंदिर बांधण्यासाठी सहा वर्षे लागली आहेत. नितीन मोरे यांनी स्पष्ट केले की मंदिरात एक खडक असेल जो वारकरी संप्रदायाच्या वतीने वारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वार्षिक यात्रेचा प्रारंभ बिंदू असणार आहे.

PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; संत तुकाराम शिला मंदिराचे करणार उद्घाटन
प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य : नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था

यावेळी पंतप्रधानांना एक विशेष टोपीही देण्यात येईल. मोरे म्हणाले की, 'ही एक डिझायनर तुकाराम महाराजांची पगडी असेल, जी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ परिधान केली जाणार आहे.' पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येईल. दरम्यान, पंतप्रधानांच्या देहू दौऱ्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. तयारीचा एक भाग म्हणून सोमवारी महाराष्ट्र पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मंदिराला भेट दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय सुरक्षा संस्थांशी सल्लामसलत करून एक बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com