प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य : नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या

भिवंडी पोलिसांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना बजावले समन्स
Nupur Sharma
Nupur SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी संपुर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे. यामूद्यावरुन जगातील अनेक राष्ट्रांनी यावक्तव्याचा निषेध ही नोंदवला आहे. या प्रकरणात भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजपचे निष्कासित कार्यकर्ता नवीन कुमार जिंदाल यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. त्यामूळे त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. (Prophet Muhammad's offensive statement; Nupur Sharma's problems increased )

Nupur Sharma
School Bus: पालकांच्या बजेटला कात्री! स्कूल बसच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

याबाबत भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व भाजपचे निष्कासित कार्यकर्ता नवीन कुमार जिंदाल यांना भिवंडी पोलिसांनी म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. भिवंडी पोलिसांनी 30 मे रोजी रझा अकादमीच्या प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीनंतर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आणि नवीन जिंदाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तत्पूर्वी, ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मला 22 जून रोजी त्यांच्यासमोर हजर राहून मोहम्मद साहेबांवर केलेल्या टिप्पणीबद्दल तिची जबानी नोंदवण्यास सांगितले होते.

Nupur Sharma
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

नुपूर शर्मा यांच्या बाजूने आणि विरोधात वेगवेगळी भाषणबाजी आणि निदर्शने सुरू

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत नुपूर शर्मा यांच्या बाजूने आणि विरोधात वेगवेगळी भाषणबाजी आणि निदर्शने सुरू आहेत. आज असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM दिल्लीतील जंतरमंतरवर नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत, तर हिंदू महासभा नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ लखनऊमध्ये पायी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले जात आहे.

आदल्या दिवशी एआयएमआयएसचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत नुपूर शर्मा यांना अटक करावी असे म्हटले होते. नुपूर शर्माने माफी मागितली नसून आपल्या वक्तव्यात इंग्रजीत 'इफ' लिहिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नुपूर शर्माने माफी कुठे मागितली? पुढे असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हे सरकार बुलडोझरचे राजकारण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com