National Herald Case: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. दुसरीकडे देशातील राजकारणही राहुल गांधींच्या भोवती फेर धरत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीने चौकशी केली. यादरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला. यातच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींसह कॉंग्रेसवर निशाणा साधला. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांची मालमत्ता हडप केल्याचे यावेळी फडणवीसांनी म्हटले. (Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi in National Herald case)
दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'राहुल गांधींनी नॅशनल हेरॉल्डप्रकरणी 2000 कोटी रुपयांची संपत्ती हडप केली. मात्र आज ज्यावेळी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलवले तेव्हा कॉंग्रेसकडून रस्त्यावर उतरुन निषेध करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी कॉंग्रेसकडून (Congress) व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती गांधी कुटुंबाने हडपली आहे. दुसरीकडे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने कॉंग्रेसकडून अपमान केला जात आहे.'
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) विचारले की, यंग इंडिया आणि एजेएल यांच्यातील कराराचा तुम्हाला कसा फायदा झाला. याशिवाय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना विचारले की, यंग इंडियामध्ये तुमची भूमिका काय होती आणि तुम्ही कंपनीचे शेअरहोल्डर कसे झालात. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल गांधी यांची 38 टक्के भागीदारी आहे.
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड
एजेएल ही जवाहरलाल नेहरु यांची कल्पना होती. 1937 मध्ये नेहरुंनी इतर 5,000 स्वातंत्र्यसैनिकांच्या साहाय्याने ही कंपनी सुरु केली होती. कंपनी विशेषतः कोणत्याही एका व्यक्तीची नव्हती. 2010 मध्ये, कंपनीचे 1,057 भागधारक होते. मात्र यामध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने 2011 मध्ये त्याचे होल्डिंग्स यंग इंडियाकडे हस्तांतरण करण्यात आले. AJL ने 2008 पर्यंत इंग्रजीमध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र, उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन म्हणून प्रकाशित केले. 21 जानेवारी 2016 रोजी, AJL ने ही तीन दैनिके पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.