आई आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःपासून वेगळे करू शकत नाही, पण गरिबी काय करत नाही. गरिबी (Poverty) हा असा आजार आहे, जो आपल्याला वाट्टेल ते करायला भाग पाडतो. या गरिबीमुळे एका आईला आपले तीन दिवसांचे मूल विकावे लागले.
महाराष्ट्रातील (Maharashtra) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शिर्डी शहरातील ही घटना आहे. येथील अत्यंत गरिबीमुळे एका महिलेने तिचे तीन दिवसांचे बाळ मुंबईतील एका पुरुषाला 1.78 लाख रुपयांना विकले. डोंबिवली (Dombivli) येथील मानपाडा पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार पोलिसांनी या गुन्ह्यात महिलेला, मुलाला विकत घेणारी व्यक्ती आणि महिलेला मदत करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे.
पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने सप्टेंबरमध्ये मुलाला जन्म दिला, परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला मूल वाढवता आले नाही, म्हणून तिने मुलाला विकण्यासाठी खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली, जेणेकरून तिला काही पैसे मिळतील.
अहमदनगर आणि ठाण्यातील कल्याण आणि मुलुंड येथील तीन महिलांनी या कामात मदत केल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांनी मुलुंड येथील एका व्यक्तीला मुलाची विक्री करण्याचा सौदा केला. एफआयआरनुसार, मुलाच्या आईने इतर आरोपींसोबत मुलाला 1.78 लाख रुपयांना विकले आणि त्यासाठी कोणतीही कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली नाही.
माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला आणि मुलाला ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर मुलाची आई, मुलाला विकत घेणारी व्यक्ती, अन्य तीन महिला आणि अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. ते म्हणाले की, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.