बनावट नोटांचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादानेच सुरु होता : मलिकांनी फोडला बॉम्ब

रियाज भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. गुन्हेगारांना वाचविण्यासाठी फडणवीसांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची मदत घेतली. असे अनेक गंभीर आरोप मलिक (Nawab Malik) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केला आहे.
 देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी या गुंडांना मोठ्या पदावर बसविले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी या गुंडांना मोठ्या पदावर बसविले. Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी , मी दाऊतच्या हस्तगांकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप केला. पण मी 2005 मध्ये मंत्री नव्हतो. एनसीबी आधिकाऱ्याला वाचविण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. मुन्ना यादव, हैदर आझम जो बांगलादेशातून आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या गुंडांना मोठ्या पदावर बसविले. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदावर बसविले. असे अनेक आरोप करत कही सवाल नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहेत.

 देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी या गुंडांना मोठ्या पदावर बसविले.
नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल, अमृता फडणवीसांच्या ट्विटला मलिकांचे प्रतिउत्तर

मलिक म्हणाले, 8 नोव्हेंबरला नोटबंदी झाल्यावर खोट्या नोटा पकडण्यात येत होत्या, पण 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाष्ट्रात एकही खोट्या नोटा पकडण्यात आल्या नाहीत. ८ ऑक्टोबरला 2017 ला बीकेसीमध्ये छापेमारी झाल्यावर तेथे 14 कोटी 56 लाख रुपये पकडण्यात आले. मुंबईत रियाज भाटी, पुण्यात इम्रान आलम शेख यांच्यासह अनेकांना पकडण्यात आले. पण 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटांना 8 लाख 80 हजार असे सांगण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पण नंतर त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्या आरोपींनाही सोडण्यात आले आणि सांगण्यात आले ते काँग्रेसचे नेते आहेत. ही केस एनआयएकडे सोपविण्यात का आली नाही. बनावट नोटांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी आहे.

 देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी या गुंडांना मोठ्या पदावर बसविले.
माझा अंडरवर्ल्डशी कोणताही संबंध नाही: नवाब मलिक

इम्रान आलम शेख हा हाजी आराफत यांचा भाऊ आहे. फडणवीसांकडून त्यांना वाचविण्यात आले. तसेच रियाज भाटी देखील या सर्व प्रकरणात होता, तरी तो भाजपच्या सर्व कार्यक्रमात उपस्थित होता. तो प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील उपस्थित होता. हे कसे? हाजी आराफत यांना देखील मंडळाचे अध्यक्ष बनविले. रियाज भाटी हे दोन पासपोर्टसह विमानतळावर 2015 ला सापडला होता. मग तो कसा सुटला आणि त्यांच्या कार्यक्रमात कसे उपस्थित राहत होता. रियाज भाटी फरर आहे, मुन्ना यादववर कोर्टात केस आहे. रियाज भाटीच्या मदतीने फडणवीसांनी वसुलीचे रॅकेट चालविले आहे. रियाज भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. गुन्हेगारांना वाचविण्यासाठी फडणवीसांनी समीर वानखेडे यांची मदत घेतली. असे अनेक गंभीर आरोप मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com