महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आज पार पडलेल्या ईडी चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांची आज अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली होती. (Nawab Malik Arrested For Money laundering)
खटल्याशी संबंधित महत्त्वाची माहिती:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची दाऊदच्या सहकाऱ्यांशी कथित व्यवहार आणि त्यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी करण्यात आली होती. ईडीने सांगितले की ते चौकशीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना टाळत होते. त्यांनी तपासात सहकार्य केले नाही.
मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात अटक झाल्यानंतर ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक म्हणाले, 'मला अटक झाली आहे, पण मी घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू. सर्वांचा पर्दाफाश आम्ही लवकरच करणार आहोत.
अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर यालाही ताब्यात घेण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेशी संबंधित काही पुरावे तपासादरम्यान समोर आले आहेत.
ईडीने आज सकाळी 62 वर्षीय नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र आणि केंद्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते आक्रमक झाले.
केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी आज सकाळी 6 वाजता राष्ट्रवादीचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर सुमारे 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली. या प्रदीर्घ अशा चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.
मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात दक्षिण मुंबईतील एजन्सीच्या कार्यालयाजवळ असलेल्या पक्षाच्या मुख्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी भाजप प्रणित केंद्र सरकार (Central Government) आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पक्षाच्या मुंबई युनिटचे प्रमुख मलिक यांच्यासोबत आहेत.
कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाकडे जात होते, मात्र पोलिसांनी त्यांना पक्ष कार्यालयाजवळ रोखले. त्यानंतर ते तिथेच आंदोलन करण्यासाठी बसले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रवक्ते संजय तटकरे म्हणाले, "हा निषेध नवाब मलिक यांच्या चुकीच्या चौकशीच्या विरोधात आहे. जे नियमितपणे भाजप, एनसीबी, सीबीआय, ईडीचे संबंध उघड करतात. आम्ही हतबल होणार नाही. राष्ट्रवादी भाजप आणि सर्व केंद्रीय यंत्रणांचा पर्दाफाश करत राहील.''
यावर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राज्याचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मलिक यांची चौकशी केली आहे. मलिक ईडीच्या कार्यालयात पोहोचले. तेथे ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यात आला.
ईडीने 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकल्यानंतर आणि अंडरवर्ल्डशी संबंध, मालमत्तांची कथित बेकायदेशीर खरेदी आणि विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा दाखल केल्यानंतर मलिक यांची चौकशी करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.