सुटकेसमध्ये दडवला होता मृत्यूचा थरार! बँकॉकहून 29 प्राण्यांना बॅगेत कोंबून आणणारा भारतीय प्रवासी जेरबंद; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Mumbai Customs Seize 29 Foreign Animals Bangkok: कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु केली.
Exotic Wildlife Smuggling Mumbai International Airport
Mumbai Customs Seize 29 Foreign Animals BangkokDainik Gomantak
Published on
Updated on

Exotic Wildlife Smuggling Mumbai International Airport: बँकॉकहून मुंबईत परतणाऱ्या एका भारतीय प्रवाशाकडून तब्बल 29 विदेशी वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आला. मुंबई कस्टम्सच्या (सीमा शुल्क विभाग) सतर्क अधिकाऱ्यांनी रविवारी (7 जून) संशयावरुन या प्रवाशाला अडवले असता हा प्रकार समोर आला. या प्रवाशाने आपल्या बॅगेमध्ये अतिशय क्रूर आणि चुकीच्या पद्धतीने या प्राण्यांना लपवून ठेवले होते.

जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा गिब्बन (एक प्रकारचा लहान माकड), मेलानिस्टिक स्क्विरल (काळी खार), बॉल पायथन (अजगर) आणि इगुआना यांसारख्या अत्यंत महागड्या आणि विदेशी प्रजातींचा समावेश आहे. या प्राण्यांची ओळख पटवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी आणि प्रथमोपचारासाठी 'डब्लूसीसीबी' (वाइल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो) आणि वन विभागाच्या समन्वयाने 'रॉ' (RAWW - रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर) या संस्थेच्या तज्ज्ञ टीमला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

Exotic Wildlife Smuggling Mumbai International Airport
Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई- गोवा वंदे भारतला 'मान्सून'चा ब्रेक! आता दररोज नाही, आठवड्यात फक्त 'इतके' दिवस धावणार

कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपी (Accused) प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु केली. भारतात सध्या विदेशी वन्यजीवांना पाळीव प्राणी (पेट्स) म्हणून घरात ठेवण्याची क्रेझ आणि मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. याच वाढत्या मागणीमुळे काही आंतरराष्ट्रीय तस्कर आणि स्थानिक एजंट अशा प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी करतात. या काळ्या बाजारातील प्रवासादरम्यान निष्पाप प्राण्यांना सूटकेस किंवा बॅगांमध्ये कोंबून आणले जाते, ज्यामुळे अनेकदा गुदमरुन त्यांचा वाटेतच मृत्यू होतो.

Exotic Wildlife Smuggling Mumbai International Airport
Mumbai Indians New Captain: मुंबई इंडियन्समध्ये भूकंप! हार्दिक पांड्या आऊट; रोहित शर्माच्या पसंतीनं ठरणार नवा 'कर्णधार'

सध्या या प्रवाशाकडे एवढ्या मोठ्या संख्येने वन्यजीव कुठून आले, हे प्राणी तो कोणाला विकणार होता आणि यामागे एखादी आंतरराष्ट्रीय मोठी गँग कार्यरत आहे का, या सर्व बाजूंनी सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.

Exotic Wildlife Smuggling Mumbai International Airport
IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

यापूर्वी देखील देशातील दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंगळुरु विमानतळावर अशाच प्रकारे विदेशी प्राण्यांची तस्करी करताना अनेक प्रवाशांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. नागरी विमानचालन महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचा आणि आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करता, जप्त करण्यात आलेल्या या सर्व 29 विदेशी वन्यजीवांना वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षितपणे पुन्हा त्याच देशात (थायलंड) परत पाठवले जाईल, जिथून त्यांना बेकायदेशीरपणे भारतात आणले जात होते. वन्यजीव संरक्षण कायदा आणि संबंधित आंतरराष्ट्रीय करारांतर्गत आरोपीवर मुंबईत कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com