Ajit Pawar Speech : पहाटेचा शपथविधी ते...; अजित पवारांच्या वादळी भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

Ajit Pawar: आज राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार गटाच्या बैठका मुबंईत पार पडल्या.
Ajit Pawar
Ajit Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

Ajit Pawar Speech: आज राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार गटाच्या बैठका मुबंईत पार पडल्या. यावेळी अजित पवारांनी वादळी भाषण केलं. यामध्ये त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

विशेष म्हणजे त्यांनी यावेळी कधीच उल्लेख न केलेल्या गोष्टींचा उहापोह केला. चला तर मग जाणून घेऊया अजित पवारांच्या भाषणातील ते 9 महत्त्वाचे मुद्दे...

अजितदादांचा काकांना निर्वाणीचा इशारा

महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन धक्कादायक घटना घडत आहेत. तीन दिवसांपूर्वीचं अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षात बंड घडवून आणलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने आले.

आज दोन्ही गटांकडून मोठ्याप्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी भाषणात शरद पवार यांच्यावर वयावरुन निशाणा साधला.

Ajit Pawar
Ajit Pawar Deputy CM Maharashtra: पिक्चर अभी बाकी हैं! महाराष्ट्राला मिळणार नवा मुख्यमंत्री; राज्यातील नेत्याचा दावा

2004 मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीमध्ये 16-16-16 चा फॉर्म्युला ठरत होता. माननीय नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचीही इच्छा होती. परंतु त्यावेळी काही आरोप होते म्हणून पुढे काही करता आलं नाही. त्यावेळी प्रचंड प्रमाणात बहुमतं होतं. सत्तेत आल्यानंतर लोकप्रतिनिधींची कामे होतील.

मात्र वैयक्तिक स्वार्थाकरिता पक्षाने निर्णय घेतला नाही. तर आज काही आमदार काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. काहीजण रुग्णालयात आहेत. काही लोक तिकडच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. ते तिकडे गेले असले तरी माझ्या संपर्कात आहेत.

मी पक्षातील आमदारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. मात्र दुसरीकडे माझी प्रतिमा दबंग नेता म्हणून करण्यात आली, पण मी तसा नाही.

माझी प्रतिमा दबंग नेता म्हणून...

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीमध्ये 16-16-16 चा फॉर्म्युला ठरत होता. माननीय नितीन गडकरी यांचीही इच्छा होती. परंतु त्यावेळी काही आरोप होते म्हणून पुढे काही करता आलं नाही. त्यावेळी प्रचंड प्रमाणात बहुमतं होतं.

सत्तेत आल्यानंतर लोकप्रतिनिधींची कामे होतील. मात्र वैयक्तिक स्वार्थाकरिता पक्षाने निर्णय घेतला नाही. तर आज काही आमदार काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. काहीजण रुग्णालयात आहेत. काही लोक तिकडच्या बैठकीला गेले आहेत.

ते तिकडे गेले असले तरी माझ्या संपर्कात आहेत. मी पक्षातील आमदारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. मात्र दुसरीकडे माझी प्रतिमा दबंग नेता म्हणून करण्यात आली, पण मी तसा नाही.

Ajit Pawar
Ajit Pawar Deputy CM : महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार

शपथविधीला जा म्हणून सांगितलं

2017 मध्ये अजित पवार, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, जयंत पाटील यांच्यासह बाकिच्यांची वर्षा बंगल्यावर चर्चा पार पडली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, चंद्रकांत दादा पाटील हे होते.

कोणत्या प्रकारची खाती, पालकमंत्री पद... मी राज्याशी खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर मी पवारांची औलाद सांगणार नाही. सगळ्या प्रकारची चर्चा झाली होती. त्यानंतर निरोप आला होता की सुनिल तटकरे यांना दिल्लीश्वरांनी बोलावले आहे.

भाजपच्या वरिष्ठाबरोबर बैठक झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष सोडणार नाही असं सांगण्यात आलं होते. तेव्हा आमचे वरिष्ठ नेते शिवसेनेला चालत नाही. त्यावेळी भाजपडून सांगण्यात आले की, आम्ही कोणत्याही स्थितील शिवसेनेला सोडणार नाही.

मी राज्याशी खोटं बोलणार नाही.

2017 मध्ये अजित पवार, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे जयंत पाटील बाकीचे वर्षा बंगल्यावर चर्चा पार पडली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे चंद्रकांत दादा पाटील हे होते.

कोणत्या प्रकारची खाती, पालकमंत्री पद, मी राज्याशी खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर मी पवारांची औलाद सांगणार नाही.

सगळ्या प्रकारची चर्चा झाली होती. त्यानंतर निरोप आला होता की सुनिल तटकरे यांना दिल्लीश्वरांनी बोलावले आहे. भाजपच्या वरिष्ठाबरोबर बैठक झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष सोडणार नाही असं सांगण्यात आलं होते.

तेव्हा आमचे वरिष्ठ नेते शिवसेनेला चालत नाही. भाजपडूनस सांगण्यात आले की, आम्ही कोणत्याही स्थितील शिवसेनेला सोडणार नाही.

Ajit Pawar
Ajit Pawar: चहात सोने टाकून पिता का?... अजित पवारांनी वाचून दाखवले 'वर्षा' बंगल्याचे चहाचे बिल

मला कुणाला बदनाम होऊ द्यायचं नाही

2 मे रोजी मी सांगितलं होतं की, राजीनामा देतो. तुम्ही सगळ्यांनी बसून कमिटी स्थापन करा आणि सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा असं सांगितलं. त्यावर आम्ही तयार झालो होतो. मग मात्र दोन दिवसानंतर अस काय घडलं...

साहेबांना राजीनामा द्यायचा नव्हता तर दिला कशाला? राज्याच्या राजकारणात जे प्रमुख चार ते पाच नेते येतात त्यामध्ये माझं नाव का येत नाही. मला आशिर्वाद का दिला जात नाही.

मला उपमुख्यमंत्री केलं, मी हूं का चू केलं नाही

2017 मध्ये शिवसेना जातीयवादी पक्ष होता, त्यानंतर लगेच दोन वर्षानंतर तो मित्रपक्ष झाला. विशेष म्हणजे, आम्ही भाजपबरोबर जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं.

त्यावेळी मला राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आलं, मी हूं का चू केलं नाही. कोरोना काळात मी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असताना कधीच हालगर्जीपणा केला नाही.

पक्षातील सगळ्या आमदारांनी पत्र लिहिलं होतं की, सरकारमध्ये सामील व्हावं म्हणून. सगळ्या आमदारांनी सह्याही केल्या होत्या. मी, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची मिळून एक कमिटी स्थापन करण्यात आली होती.

भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं अशा महत्वाच्या गोष्टी फोनवर बोलून चालत नाही. इंदूरला बोलावलं. पण प्रसारमाध्यमाला कळेल म्हणून तिकीट रद्द केलं. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला नव्हता.

सगळ्या आमदारांच्या पत्राची झेरॉक्स कॉपी माझ्याकडे आहेत. मात्र तरीही लोकांच्या समोर मला व्हिलन का केलं जातं कळत नाही.

Ajit Pawar
Sharad Pawar: शरद पवारांचा राजीनामा मागे, पण चर्चा अजित पवारांच्या अनुपस्थितीची

मग मला आशिर्वाद का दिला जात नाही

2 मे रोजी मी सांगितलं होतं की, राजीनामा देतो. तुम्ही सगळ्यांनी बसून कमिटी स्थापन करा आणि सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा असं सांगितलं. त्यावर आम्ही तयार झालो होतो.

मग मात्र दोन दिवसानंतर अस काय घडलं... साहेबांना राजीनामा द्यायचा होता तर दिला कशाला होता. राज्याच्या राजकारणात जे प्रमुख चार ते पाच नेते येतात त्यामध्ये माझं नाव का येत नाही. मला आशिर्वाद का दिला जात नाही.

मी सुप्रियालाही बोललो, ते हट्टी आहेत.

शेतकरी मुलगा जेव्हा 25 वर्षांचा झाला की त्याला सांगितलं जातं तू आता शेती बघ मी तुला सल्ला देण्याचं काम करतो. मी सुप्रियालाही सांगितलं होतं की, ते हट्टी आहेत. हा असला कसला हट्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com