Ajit Pawar Deputy CM Maharashtra: पिक्चर अभी बाकी हैं! महाराष्ट्राला मिळणार नवा मुख्यमंत्री; राज्यातील नेत्याचा दावा

Maharashtra Politics: महाराष्ट्राला ही परंपरा कधीच नव्हती. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा मग ती राजकीय असो वा सामाजिक, असे काहीही आजवर घडले नाही.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsDainik Gomantak

Eknath Shinde to be Replaced by Ajit pawar as CM of Maharashtra: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची लवकरच मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी होणार असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर एकनाथ शिंदे यांना हटवण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात भाजप शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडत आहे, पण त्याचा फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राला ही परंपरा कधीच नव्हती. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा मग ती राजकीय असो वा सामाजिक, असे काहीही आजवर घडले नाही, पण आज मी कॅमेऱ्यासमोर म्हणतोय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांना काढण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या अपात्रतेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे गडबडीत अजित पवारांना सोबत घेतले असून अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत.
संजय राऊत, प्रवक्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Maharashtra Politics
Ajit Pawar: अजित पवारांसह 9 जणांविरुद्ध राष्ट्रवादीकडून अपात्रतेची याचिका

खासदार संजय राऊत म्हणाले, 'भाजप शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फोडत आहे, पण त्याचा फायदा होणार नाही. महाराष्ट्रात आम्ही एकजुटीने लढू.

राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते आणि आता त्याच नेत्यांनी राजभवनात शपथ घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या विरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अद्याप न्यायालयात असून त्यांच्या सदस्यत्वावर अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

या आमदारांचे सदस्यत्व नाकारले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा स्थितीत स्वत: एकनाथ शिंदे यांनाही अपात्र ठरवले जाऊ कते.

Maharashtra Politics
Sharad Pawar Live : शरद पवारांची पत्रकार परिषद Ajit Pawar | NCP | Ajit Pawar Oath | Ajit Pawar Rebel

अजित पवार यांच्यासोबत कोणते आमदार?

अजित पवार यांच्यासोबत येणा-या आमदारांची संख्या खूप जास्त आहे, तर काही आमदार असे आहेत की ज्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

अजित पवार यांच्यासमवेत असलेल्या आमदारांमध्ये शेखर निकम, प्रकाश सोळखे, दीपक चव्हाण, संग्राम जगताप, चेतन तुपे, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, दिलीप मोहिते, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, चंद्रकांत नवघरे, राजेंद्र कारेमोरे, मनोहर चंद्रकापुरे, इंद्रनील नाईक, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, सरोज अहिर, आदिती तटकरे, अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, धनंजय मुंडे आदी नेत्यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com