Ajit Pawar: चहात सोने टाकून पिता का?... अजित पवारांनी वाचून दाखवले 'वर्षा' बंगल्याचे चहाचे बिल

कांद्याला भाव का मिळत असाही प्रश्न विचारला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarDainik Gomantak
Published on
Updated on

Ajit Pawar: महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेना युती यांच्यामध्ये नेहमीच आरोप- प्रत्यारोप होताना दिसत असतात. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सरकारच्या कामाचा लेखाजोगा वाचून दाखवला आहे. वर्षा बंगल्याच्या चहापानाचा खर्च वाचून दाखवत त्यांनी खरमरीत शब्दात सरकाराच्या कामाचा आणि केलेल्या खर्चाचा समाचार घेतला आहे.

वर्षा बंगल्याच्या खानपानाचं बिल 2 कोटी 38 लाख आहे. असं म्हणत चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर जाहीरातींसाठी केलेला खर्चही कोट्यावधी असून हा अवैध खर्च असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
Manish Sisodia Arrested: केजरीवालांचा अंदाज ठरला खरा; दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना CBI ने केली अटक

दरम्यान, या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. कांद्याला भाव का मिळत असाही प्रश्न विचारला आहे. हे सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.

राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनाच्या पुर्व संध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे मात्र महाविकास आघाडीने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

Ajit Pawar
Narayan Rane Vs Ajit Pawar: अजितदादा म्हणाले, राणेंना बाईनं पाडलं... त्यावर राणेंनी दिला 'हा' इशारा...

अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. हसिना पार्करला चेक दिलेले नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची त्यांची धमक नव्हती, त्यांचे साथीदार अजित पवारांसोबत चहा पिण्याची वेळ आमची टळली, असे एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या चहापानाच्या बहिष्काराला उत्तर देताना म्हटले आहे.

शिवाय अजित पवारांना सत्तेची सवय झाली आहे.आत्ता त्यांच्याकडे सत्ता नसल्याने ते अशा प्रकारची वक्तव्ये करत असल्याचेदेखील एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com