NCP Ajit Pawar new Deputy CM of Maharashtra: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार राजभवनात पोहोचले. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी अजित पवार यांच्या मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी संघटना सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असतील. पवारांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली गेली. 2019 मध्येही अजित पवारांनी बंडखोरी केली होती.
त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजभवनात पहाटे शपथ घेतली होती. मात्र, शरद पवार सक्रिय झाल्यानंतर ते परत आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना होऊन महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच वर्षे सरकार चालले.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या ते कोल्हापूरचे आमदार आहेत. त्यांच्याशिवाय दिलीपर वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल भाईदास आणि संजय बनसोडे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या या फुटीमुळे उद्धव ठाकरे गटालाही मोठा झटका बसला आहे. शरद पवार यांनी पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणे आणि राहुल गांधींसोबत स्टेज शेअर करणे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आवडले नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे नेते आज पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. हे समीकरण महाराष्ट्राला बळकट करण्यासाठी तयार झाले आहे.
तर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने भाजपला (BJP) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. आज राष्ट्रवादीचे 40 हून अधिक आमदार सामील झाले आहेत.
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, 'महाराष्ट्रातील जनता हा खेळ जास्त काळ सहन करणार नाही.' अजित पवारांच्या या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी चांगलीच अडचणीत सापडली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. पहिल्यांदाच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. दुसऱ्यांदा ते महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि आता तिसऱ्यांदा थेट उपमुख्यमंत्री झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.