Belgaum Border Issue: 'बेळगाव सीमाप्रश्न संपलेला विषय'; भाजप खासदाराने मराठी भाषिकांना डिवचले

Maharashtra Karnataka Border Issue: भाजप खासदारावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे.
MP Iranna Kadadi On Marathi Issue
MP Iranna KadadiDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांना भाजप खासदाराने डिवचले आहे. ‘बेळगाव सीमाप्रश्न हा संपलेला विषय आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने कडाडी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

“इराणी कडाडी यांनी बुधवारी (२ जुलै) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत बोते. सीमाप्रश्न संपलेला विषय आहे. यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. काही राजकीय पक्ष हा मुद्दा जिंवत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते देखील अपयशी ठरले आहेत. येथील नागरिकांना विकास महत्वाचा असल्याचे समजले आहे,” असे वक्तव्य कडाडी यांनी पत्रकार परिषदेत केले.

कडाडी यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. "सीमाप्रश्न संपल्याचे बालिश वक्तव्य खासदार कडाडी यांनी केले आहे. बेळगावचा मराठी माणूस एवढा स्वाभीमानी आहे की या चळवळीसाठी अजून ७० वर्षे गेली तरी त्यासाठी प्राणपणाने लढण्याची आमची तयारी आहे. अशी बालिश वक्तव्य करुन आकलेचे तारे कडाडी यांनी तोडू नये. मागच्या दरवाजाने निवडून आलेल्या कडाडी यांनी जनतेतून प्रत्यक्ष निवडणूक लढवून जिंकावे," असे शुभम शेळके म्हणाले.

MP Iranna Kadadi On Marathi Issue
Goa Crime: 'सोनसाखळी चोर' इराणी गँग गोव्यात पुन्हा सक्रिय! मायणा-कुडतरी चोरी प्रकरणातील एकाला पुण्यातून अटक

“सीमाप्रश्न संपला असे म्हणणे तुम्हाला तरी पटते हे स्वत:लाच एकदा विचारा. या चळवळीसाठी शेकडो नागरिकांनी बलिदान दिले आहे. बालिश वक्तव्य करुन तुम्ही तुमच्या राजकीय प्रवासाची उलटी वाटचाल सुरु केली आहे. बेळगाव ज्यावेळी महाराष्ट्रात सामिल होईल, त्याचवेळी ही चळवळ समाप्त होईल,” असे शेळके म्हणाले.

MP Iranna Kadadi On Marathi Issue
Goa Made Liquor Seized: गोव्यातून कर्नाटकला दारू तस्करी, शक्कल लढवली पण... 12 लाखांचे मद्य जप्त

“मराठी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सीमाप्रश्न संपलेला नाही. डबल इंजिन सरकार आहे तर न्यायालयात जाऊन या गोष्टी सांगा. बेळगाव, कारवार, भालकी, बिदर, निपाणी हा बहुभाषिक मराठी प्रदेश आहे. महाराष्ट्र सामिल होण्यासाठी हा प्रदेश सामाजिक, राजकीय लढाई लढतोय. या मराठी माणसाच्या मागे महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com