Goa Politics: त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का'! मंत्री ढवळीकरांची RGP वर टीका, Watch Video

Sudin Dhavalikar On RGP: गोवा राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, मंत्री सुदिन ढवळीकर यांनी रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (आरजीपी)वर जोरदार टीका केली आहे.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, मंत्री सुदिन ढवळीकर यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी)वर जोरदार टीका केली आहे. आरजीपीकडे गोव्यात कोणतेही ठोस काम, धोरण किंवा स्पष्ट अजेंडा नाही, असा आरोप करत त्यांनी पक्षाची दिशेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ढवळीकर म्हणाले की, आरजीपीला जिथे बोलावले जाते मग ते दिल्ली असो किंवा खोर्ली, ते तिथे हजर राहतात. गोव्याच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याऐवजी हा पक्ष केवळ संधीसाधूपणे वागत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आरजीपीची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी आहे असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.

Sudin Dhavalikar
Goa Politics: काँग्रेसचा 2027 साठी मास्टरस्ट्रोक! 'आरजी'चा पत्ता कट, गोवा फॉरवर्डशी जमवणार जवळीक; ठाकरे, निंबाळकरांशी लवकरच चर्चा

पुढे ते म्हणाले त्यांचे गोव्यात काहीच काम नाही. त्यांचे गोव्यासाठी योगदान शून्य असल्याचेही त्यांनी सांगितले. गोव्यात जे प्रकल्प येतात ते कायम त्याविरोधी भूमिका घेतात असेही त्यांनी नमूद केले.

Sudin Dhavalikar
Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

पुढे बोलताना ढवळीकर यांनी आरजीपीची तुलना आम आदमी पक्षाशी करत, भविष्यात आरजीपीची स्थिती आपपेक्षाही अधिक वाईट होऊ शकते, असा इशाराही दिला. ढवळीकर यांनी आरजीपीवर अप्रत्यक्षपणे निष्क्रियतेचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे गोवा राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com