Konkan Railway: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विशेष साप्ताहिक गाडी सुरु; पाहा वेळापत्रक

Konkan Railway Special Trains: उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Konkan Railway
Konkan Railway Special TrainsDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway Announces Special Trains for Summer Holidays and Shimga Festival

व्यस्त कामातून एक-दोन दिवसांची सुट्टी मिळाली की, अनेकांची पावले कोकणाच्या दिशेने वळतात. कोकणातील निळ्याशार समुद्रकिनारी विहरण्याची मजा काही औरचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली छोटी-छोटी गावे पर्यटकांना मोहिनी घालतात. अशा या मनमोहित करणाऱ्या कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाने खास बेत आखला आहे. 

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय

दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने (Konkan Railway) विविध मार्गांवर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा ओघ पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्या आणि शिमग्यासाठी जाणाऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

Konkan Railway
Konkan Railway: अन्यथा लोक रस्त्यावर उतरून विरोध करतील! नवीन रेल्वे स्थानकांसंदर्भात कॅ. विरियातोंचा इशारा

वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावरुन उधान जंक्शन ते मंगळुरु जंक्शन ही स्पेशल गाडी येत्या रविवारीपासून (9 मार्च) 30 जूनपर्यंत धावणार आहे. ही स्पेशल गाडी द्विसाप्ताहिक म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस (बुधवारी आणि रविवारी) धावणार आहे. या स्पेशल गाडीचा प्रवास उधान जंक्शन येथून रात्री 8 वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.45 मिनिटांनी मंगळुरु जंक्शन येथे संपेल. तर परतीच्या प्रवासासाठी मंगळुरुहून ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी उधान जंक्शनसाठी निघेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी उधानला पोहोचले.

Konkan Railway
Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! शिमग्याच्या तोंडावर पुन्हा धावणार सावंतवाडी पॅसेंजर आणि दादर-रत्नागिरी ट्रेन

स्पेशल गाडी कुठे थांबणार?

उधना जंक्शन- वलसाड- वापी- पालघर- वसई रोड- भिवंडी रोड- पनवेल- पेन- रोहा- माणगाव- खेड- चिपळूण- सावर्डा- संगमेश्वर- रत्नागिरी- राजापूर रोड- वैभववाडी रोड- कणकवली- सिंधुदुर्ग- कुडाळ- सावंतवाडी रोड- थिविम- करमाळी- मडगाव जंक्शन- काणकोण- कारवार- अंकोला- गोकर्ण रोड- कुम्ता- मुरूडेश्वर- भटकळ- मुकाम्बिका रोड- कुन्दपुरा- उडुपी- मुल्की- सुरथकल- थोकुर- मंगळुरु जंक्शन 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com