Konkan Railway: अन्यथा लोक रस्त्यावर उतरून विरोध करतील! नवीन रेल्वे स्थानकांसंदर्भात कॅ. विरियातोंचा इशारा

New Konkan Railway stations in Goa: केंद्रीय रेल्वे प्रवासी समिती बैठकीला कोकण रेल्वे महामंडळाचे सरव्यवस्थापक संतोष कुमार झा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सारझोरासह अन्य दोन ठिकाणी कोकण रेल्वेतर्फे स्थानके बांधण्याचा विचार सुरू केला आहे, त्याला स्थानिकांनी विरोध केला असून या स्थानकांसंदर्भात आधी लोकांना विश्वासात घ्या आणि नंतरच काय तो निर्णय घ्या असा इशारा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज दिला. अन्यथा लोक रस्त्यावर उतरून आपला विरोध प्रगट करतील, असे त्यानी सांगितले.

आज मडगाव येथील एका हॉटेलमध्ये केंद्रीय रेल्वे प्रवासी समितीची बैठक झाली. या बैठकीला कोकण रेल्वे महामंडळाचे सरव्यवस्थापक संतोष कुमार झा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. केरळचे खासदार प्रेमचंद्रन यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

यावेळी कॅप्टन फर्नांडिस यांनी ही स्थानके कोळसा हाताळणीसाठी बांधली जातात अशी स्थानिकांमध्ये भीती आहे, असे सांगितले. मात्र, ही प्रस्तावित स्थानके लहान स्वरूपाची असून तिथे कोळसा हाताळला जाणार नाही, असे झा यांनी सांगितले. यावेळी बैठकीच्या इतिवृत्तात तसा उल्लेख करावा, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली.

Viriato Fernandes
Sarzora Railway Station: रेल्वे स्टेशन झाल्यास परप्रांतीय वाढतील, गुन्हेगारी वाढेल! सारझोरातील स्थानिकांनी व्यक्त केली भीती

‘प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्यांना नोकरी द्या’

रेल्वे मार्गासाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यापैकी काहीजणांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही याकडेही फर्नांडिस यांनी लक्ष्य वेधले. अशा जमिनी दिलेल्या कुटुंबीयांना एक तर रेल्वेत नोकरी द्या किंवा रेल्वे स्थानकावर स्टॉल द्या अशी मागणी त्यांनी केली. रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांना योग्य त्या सुविधा मिळतील याकडे कोकण रेल्वे महामंडळाने लक्ष द्यावे, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com