Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी महत्वपूर्ण निर्णय

 Uddhav Thackeray & Eknath Shinde
Uddhav Thackeray & Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात जूनमध्ये मोठी राजकीय उलाथापालथ झाली, शिवसेनेत फूट पडली आणि सत्तेत असलेले उद्धव ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेत आले. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष याचा निर्णय न्यायालयात पोहचला आहे. या सगळ्या प्रकरणासाठी सोमवारचा दिवस महत्वपूर्ण आहे. उद्या या प्रकरणाचा निर्णय होणार की प्रकरण खंडपीठाकडे सोपविले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगातही जी लढाई सुरु झालीय, त्यावर देखील न्यायालय काय आदेश देतं हेही पाहणं महत्वाचं असेल. याशिवाय सोमवारनंतर लगेच मंगळवारी निवडणूक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. कारण 23 ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे गटानं आपलं म्हणणं मांडावं असं आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे उद्या काही महत्वपूर्ण निर्णय येतो तसेच, मंगळवारी काय निर्णय येतो का हे प्रकरण आणखी लांबणीवर पडतं याची उत्सुकता आहे.

 Uddhav Thackeray & Eknath Shinde
स्वावलंबन, स्वयंपूर्णता केवळ सहकारातून शक्य : मंत्री सुभाष शिरोडकर

काय आहेत महत्वाचे मुद्दे

उद्या निर्णय होणार की प्रकरण घटनापीठाकडे सोपवले जाणार

प्रकरण घटनापीठाकडे गेल्यास अधिक काळ लांबण्याची शक्यता

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कारवाईचा निर्णयाचे काय होणार?

निवडणूक आयोगातील निर्णयाचा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाचा दिवस.

दरम्यान, सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. निवृत्तीआधी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतायत का हे देखील उद्याच समजणार आहे.

 Uddhav Thackeray & Eknath Shinde
Goa Corona Update: गोव्यातील कोरोना बाधितांची संख्या अडीच लाख, आज 115 नवे रूग्ण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com