Goa Corona Update: गोव्यातील कोरोना बाधितांची संख्या अडीच लाख, आज 115 नवे रूग्ण

Goa
Goa Dainik gomantak
Published on: 
Updated on: 

गोव्यात आज दिवसभरात 115 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 87 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यासह गोव्यातील आजवर कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या अडीच लाख झाली आहे. गोव्यात सध्याच्या घडीला 960 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे मागील तीन दिवसांत गोव्यात एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 54 हजार 974 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 50 हजार 057 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.07 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,957 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 848 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

Goa
Rajesh Phaldesai: गोवा डेअरीला लालफितीतून बाहेर पडण्यासाठी मदतीची गरज

देशातील सक्रिय रूग्णांची संख्या एक लाखाच्या आत

देशात देखील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 11,539 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 43 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 99 हजार 879 रूग्ण उपचाराधीन आहेत. देशात सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली, पंजाब या राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रूग्ण आहेत.

Goa
Vaibhavwadi: उंबर्डे कुंभारवाडी येथे मोरी खचल्याने खारेपाटण-भुईबावडा वाहतूक ठप्प

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com