स्वावलंबन, स्वयंपूर्णता केवळ सहकारातून शक्य : मंत्री सुभाष शिरोडकर

राज्यात दुग्ध व्यवसायाला वाव
सहकार
सहकार

सासष्टी: सहकारात जितका वाव आहे, तितका अन्य कुठल्याही क्षेत्रात नाही. सहकार क्षेत्रापासून एखादी व्यक्ती किंवा युवक स्वालंबनाचा मार्ग अवलंबू शकते. गोमंतकीयांनी केवळ सरकारी नोकऱ्यांमागे न धावता सहकार क्षेत्राचा फायदा घेत स्वतःचा उद्योग धंदा, व्यवसाय करावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

( Minister Subhash Shirodkar said that self-reliance, self-sufficiency is possible only through cooperation)

सहकार
श्री बोडगेश्वर संस्थान आमसभेत गैरव्यवहारांचे आरोप-प्रत्यारोप

केपे अर्बन मल्टिपर्पज को ओपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या 30 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, सोसायटीचे चेअरमन प्रकाश शंकर वेळीप. सर्व संचालक, सहकार निबंधक विशांत गावणेकर उपस्थित होते. मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते समई प्रज्वलीत करुन सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले.

सहकार
''जमीन हडप प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून 'एसआयटी'तपासात हस्तक्षेप''

राज्यात दुग्ध व्यवसायाला वाव

गोव्यात दररोज इतर राज्यांतून जवळ जवळ 1 कोटी रुपयांच्या दुधाची आयात होते. त्यामुळे गोव्यात दुग्धव्यवसायाला वाव आहे. सहकारी बॅंका किंवा पतसंस्थाकडून कर्ज घेऊन व्यवसायात यशस्वी झालेल्या लोकांची एक यादी तयार करणे गरजेचे आहे. ही यादी जाहीर झाल्यावर लोकांमध्ये, युवकांमध्ये जागृती ही होऊ शकेल, असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com