Pankaja Munde: मला केवळ 'या' व्यक्तीची भीती... पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

कार्यकर्ते मला हीरोच मानतात, हीरोईन नाही...
Pankaja Munde
Pankaja Munde Dainik Gomantak
Published on
Updated on

Pankaja Munde: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी त्या कुणाला घाबरतात ते सांगितले आहे. दरम्यान, कार्यकर्ते मला हीरोच मानतात, हीरोईन नाही, असेही त्या म्हणाल्या.

Pankaja Munde
Goa Helicopter Ride: गोव्यात आज हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ; पर्यटकांना आसमंतातून घेता येणार विहंगम दर्शन

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण जगात कुणालाच घाबरत नाही, पण मी माझ्या मुलाला खूप घाबरते, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी यामागचं कारणही सांगितलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळचा त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझा मुलगा 21 वर्षाचा आहे, त्यामुळे मला कळत नाही की तुमच्याशी कसं बोलावं. त्याला बोलताना पण मी खूप घाबरते. या जगात मी कुणालाच घाबरत नाही, पण माझ्या मुलाला ‘आर्यामन’ला मी खूप घाबरते. कारण तुमची बुद्धी एवढी तीक्ष्ण आणि तीव्र आहे की, त्यामुळे तुमच्यासोबत वाद घालण्यात काहीही अर्थ नसतो. तुमच्या उत्तरामुळे आम्हीच बुचकाळ्यात पडतो. त्यामुळे आम्हालाच प्रश्न पडतो की, आता याला काय उत्तर द्यायचं. त्यामुळे तुमच्यासमोर येणं माझ्यासाठी फार आनंदाची, अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे.

Pankaja Munde
Vande Bharat Express Train: मुंबईहून लवकरच धावणार 2 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, जाणून घ्या

तसेच, मला माझ्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते हिरोच म्हणतात, हिरोईन म्हणतच नाहीत. असही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचा पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यात पंकजा मुंडे व्यासपीठावर भाषणासाठी माईकजवळ येतात आणि मला आधी बोलू द्या, अशी विनंती बावनकुळेंना करताना दिसतात, असे दिसत होते, तथापि, बावनकुळे यांनी त्यांना नकार देत स्वतःच बोलायला सुरवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com