Goa Helicopter Ride: गोव्यातील समुद्रकिनारे आणि एकूणच सौंदर्य अनुभवण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक गोव्यात येत असतात. आता गोव्याचे हेच सौंदर्य हेलिकॉप्टर राईडमधुनही अनुभवता येणार आहे. आजपासून या हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ होत आहे. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना गोव्याचे विहंगम दर्शन घेता येणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत ओल्ड गोवा येथील दावजी एला हेलिपॅडवर 4 वाजता या सेवेस प्रारंभ होत आहे.
हॉक सोअरिंग एअरोस्पेस प्रा. लिमिटेड या कंपनीतर्फे ही सेवा उपलब्ध केली जात आहे. यातून सेवेचे विविध पर्याय देण्यात येणार आहेत. त्यात मोपा येथील मनोहर विमानतळावरून किंवा दाबोळी विमानतळावरून थेट रिसॉर्टवर पोहचविण्याची सेवा आहे.
शिवाय आंतरराज्य सेवाही दिली जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. विशेष डे-ट्रिप्स चार्टसमधून व्यावसायिक ट्रिप्स जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कोल्हापूर, हम्पी, शिर्डीसाठीही ही सेवा दिली जाणार आहे.
गोव्याचा विहंगम नजारा अनुभवता येणार
हेलिकॉप्टर राईडमधून गोव्याचा विहंगम नजारा अनुभवता येणार आहे. राज्याच्या आसमंतात 10 मिनिटे हेलिकॉप्टरमधून विहार करता येणार आहे. या थरारक अनुभवासाठी प्रतीव्यक्ती 8000 रूपये शुल्क असणार आहे. सकाळी 11 ते 12 या वेळेत ही सेवा दिली जाणार आहे.
दरम्यान, या सेवेच्या उद्धाटनप्रसंगी सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गांवकर, कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई, राज्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल,पर्यटन सचिव संजीव आहुजा, राज्याच्या पर्यटन विभागाचे संचालक निखिल देसाई, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मणेरकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.