Hindustani Bhau
Hindustani BhauDainik Gomantak

Hindustani Bhau: विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

न्यायालयाने विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Published on

सोशल मीडियावरती प्रभाव टाकणारा विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विकास पाठक यांच्यावर मंगळवारी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवून दिल्याचा आरोप आहे. विकास उर्फ ​​हिंदुस्थानी भाऊचे वकील महेश मुळ्ये यांनी सांगितले की, त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जामिनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावरती सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, तोपर्यंत विकासला तुरुंगातच राहावे लागणार. विकासविरुद्ध भादंविच्या कलम 353, 332, 427, 109, 224, 143, 146, 147, 149 आणि आयपीसीच्या कलम 188, 269, 270 अंतर्गत दंगल भडकावणे यासह गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Hindustani Bhau
राणीची बाग होणार पर्यटकांसाठी खुली

31 जानेवारी रोजी मुंबईतील धारावीसह राज्यातील विविध शहरांमध्ये ऑफलाइन परीक्षेला विरोध करण्यासाठी दहावी आणि बारावीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. सोशल मीडियावरती प्रभाव टाकणारा विकास पाठक उर्फ ​​हिंदुस्थानी भाऊ याने विद्यार्थ्यांना भडकवले असा आरोप करण्यात आला होता.

याआधी मंगळवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) हिंदुस्थानी भाऊला विद्यार्थ्यांना (Students) आंदोलनासाठी (Movement) भडकवून दिल्याप्रकरणी अटक केली होती. हिंदुस्थानी भाऊने अटकपूर्व जामिनासाठी वकिलांचा सल्ला घेतला होता. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील (Valse Patil) यांनी दिले. सोमवारी मुंबईतील धारावीमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने देखील केली. कोविड-19 (Covid-19) च्या संकटाच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Hindustani Bhau
फडणवीसांनी आधी गोव्यात दारूबंदी करावी

महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात सोमवारी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांनी मुंबईतील धारावी येथील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या बंगल्याचा घेराव केला आणि शेकडोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला पळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. रविवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षा वेळेवर होतील आणि ऑफलाइन होतील असे त्यांनी सांगितले. याबाबतच विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. परीक्षेची वेळ वाढवून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com