सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आज निशाणा साधला आहे. (NCP leader Eknath Khadse asks Devendra Fadnavis demand liquor ban in BJP ruled Goa)
खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा निवडणूक प्रभारी यांना एक प्रश्न विचारला आहे. 'गोव्यातही अशीच दारूबंदीची मागणी करण्याचे धाडस कधी केले का? गोव्यातील (Goa) प्रत्येक गल्लीत दारू उघडपणे विकली जाते. फडणवीस यांनी आधी गोव्यात दारूबंदी करावी. ते भाजपशासित गोव्यात दारूविरोधात बोलू शकतात का,' असा सवाल खडसेंनी विचारला आहे.
फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीचे निवडणूक प्रभारी आहेत आणि ते सध्या त्या राज्यात भाजपचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यावर फडणवीस यांनी आपली भूमिका विचारली असता त्यांनी महाराष्ट्र राज्याची चिंता आहे असे सांगितले. 'मी राज्याचे विरोधी पक्षनेते असल्याने महाराष्ट्राशी संबंधित मुद्दे मांडले. मी महाराष्ट्राचा आहे. माझी चिंता महाराष्ट्राची आहे. मी महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनू देणार नाही, आम्ही एमव्हीएच्या वाइन धोरणाचा तीव्र निषेध करू. या निर्णयामुळे अनेक स्तरांतून अस्वस्थता निर्माण झाली आहे,'असे फडणवीस म्हणाले.
भाजपचे (BJP) माजी मंत्री खडसे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी पक्ष सोडला होता. त्यांनी अनेकदा फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली आहे. जळगावात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना खडसेंनी आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी फडणवीसांनी पुण्यातील जमीन प्रकरणात आपल्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडकवल्याचा आरोप केला. 'फडणवीस यांनी मला खोट्या जमिनीच्या प्रकरणात अडकवले. मला मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी होती,'असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.